शेतकरी मित्रांनो आपल्या देशातील केंद्र सरकारच्या वतीने पी एम किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येत आहे. या पी एम किसान योजना अंतर्गत देशातील शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत केंद्र सरकार करत असते. आपल्या देशात मोदी सरकार आल्यापासून ही योजना राबविण्यात येत आहे. संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत मानधन राष्ट्रीय प्राप्त होत आहे. 1 डिसेंबर 2018 पासून संपूर्ण भारत देशात पीएम किसान सन्मान निधी योजना राबविण्यात सुरुवात झालेली आहे. देशातील अनेक राज्यातील लाखो शेतकरी या योजनेअंतर्गत लाभ मिळवत आहेत. पी एम किसान योजना अंतर्गत नवीन नोंदणी सुरू झालेली असून ही नोंदणी कशी करायची तसेच कागदपत्रे व इतर माहिती आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
Pm kisan yojna अंतर्गत देशातील प्रत्येक शेतकऱ्याला लाभ देण्यात येत आहे. सुरुवातीला पी एम किसान योजना अंतर्गत असलेली दोन हेक्टर ची मर्यादा शिथिल करून केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्याचे ठरविले आहे. आता या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आलेली असून सरसकट शेतकरी बांधवांना या योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये मानधन देण्यात येत आहे. पी एम किसान योजना संपूर्ण भारत देशामध्ये राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत कुटुंबातील एका सदस्याला लाभ मिळवता येतो. pm kisan new registration 2022
पी एम किसान योजना तुम्ही पात्र आहात का ते पाहण्यासाठी येथे चेक करा
Pm Kisan New Registration करून आपण या योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता नोंदणी करू शकतो. याकरिता आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागत असतो. पी एम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दर चार महिन्याच्या अंतराने दोन हजार रुपये म्हणजेच वर्षाला तीन हप्ते असे मिळून सहा हजार रुपये देण्यात येत असतात. पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत लाभ मिळण्याकरिता आपल्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. जमिनीच्या कमाल मर्यादीची अट शिथिल केल्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांना सुद्धा आता लाभ मिळता येत आहे. pm kisan samman nidhi yojana 2022
पी एम किसान योजना अंतर्गत नवीन (Pm Kisan Yojana New Registration) नोंदणी सरकारने मध्यंतरी बंद केलेली होती. परंतु आता Pm Kisan New Registration हे केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेले असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी नवीन जमिनी खरेदी केलेली आहे, किंवा कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर जमीन केलेली आहे अशा व्यक्तींना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता नोंदणी करता येणार आहे.
पी एम किसान योजना नोंदणी कशी करायची? How to register PM Kisan Yojana?
शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत नवीन नोंदणी ही सुरू झालेली असून ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान नवीन नोंदणी करायची आहे त्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिसियल पोर्टल जाऊन नोंदणी करायची आहे. पी एम किसान नोंदणी करण्याकरिता खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.
पी एम किसान योजना नवीन नोंदणी करण्याच्या वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
- सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवर जा.
- आता या वेबसाईटच्या होमपेज वर आल्यानंतर तुम्हाला वेबसाईट स्क्रोल डाऊन करायची आहे.
- आता खाली तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन म्हणजेच नवीन नोंदणी करा असा पर्याय दिसत असेल त्यावर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर दोन पर्याय आलेले आहे Rural Farmer Registration आणि Urban Farmer Registration यापैकी जर तुम्ही ग्रामीण भागातील असाल तर पहिला पर्याय निवडा आणि शहरी भागातील असाल तर दुसरा पर्याय निवडा.
- आता तुमचा आधार कार्ड नंबर तसेच तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं राज्य निवडा तसेच खाली दिसत असलेल्या कॅपच्या त्या बॉक्समध्ये प्रविष्ट करून get otp या पर्याय वर क्लिक करा.
- आता मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून सबमिट करा.
- आता तुमच्यासमोर पीएम किसान योजनेचा संपूर्ण फॉर्म ओपन झालेला आहे त्यामध्ये विचारलेली तुमची वैयक्तिक तसेच जमिनीची माहिती व बँक डिटेल व इतर आवश्यक माहिती टाकून अर्ज सबमिट करा.
अशाप्रकारे आपल्याला पी एम किसान योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज करता येतो.
पी एम किसान योजनेअंतर्गत नवीन नोंदणी सध्या सुरू असून ही नोंदणी प्रक्रिया बंद होण्यापूर्वी सर्व शेतकरी बांधवांनी पी एम किसान योजना नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यावे.