पी एम वाणी योजना महाराष्ट्र सुरू; संपूर्ण माहिती | PM Wani Yojana Maharashtra

मित्रांनो आपल्या देशातील केंद्रीय सरकार तसेच विविध राज्य सरकार हे देशातील तसेच राज्यातील लोकांच्या कल्याणाकरिता विविध प्रकारच्या शासकीय योजना राबवित असते. देशातील नागरिकांना ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टी योजनेच्या स्वरूपात त्यांना उपलब्ध करून देण्यात येत असतात. विविध शेतकरी योजना तसेच छोट्या मोठ्या व्यवसायिकांसाठी योजना, महिलांकरिता योजना वेळोवेळी राबवण्यात येत असतात. अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण अशी पीएम वाणी योजना आपल्या महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. ही पी एम वाणी योजना काय आहे? PM Wani Yojana Maharashtra या संदर्भात विस्तृत माहिती आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात येणारी पीएम वाणी योजना ही महाराष्ट्र सरकारच्या वतीने आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या रास्त भाव धान्य दुकानांच्या मार्फत राबविण्यात येत आहे. म्हणजेच या पीएम वाणी योजनेची अंमलबजावणी ही रास्त भाव धान्य दुकान या ठिकाणाहून करण्यात येईल. आपल्या महाराष्ट्र सरकारच्या वतीने 14 नोव्हेंबर 2022 या दिवशी या योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण असा एक शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे. पीएम वाणी योजना ला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली असून लवकरच ही योजना राबविण्यात येत आहे.

आपल्या महाराष्ट्र शासनाचा अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण विभाग हे या योजनेची प्रतिनिधित्व करणार आहे. PM wani Yojana Maharashtra 2022-23 अंतर्गत नागरिकांना खास करून ग्रामीण भागातील नागरिकांना इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्र शासनाचा हेतू आहे.

 

पीएम वाणी योजना सुरू करण्या मागचे उद्दिष्ट Objective behind launching PM Wani Yojana

जेव्हा कोणतेही राज्य सरकार किंवा केंद्र सरकार कोणतीही योजना सुरू करत असते, त्यामागे त्या योजनेचा उद्देशा नागरिकांना  सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हा असतो. तर चला जाणून घेऊया पीएम वाणी योजनेची उद्दिष्ट.

1. सार्वजनिक ठिकाणी लोकांना वायफाय सुविधा उपलब्ध करून देणे, तेही नागरिकांना परवडेल अशा दरात.

2. इंटरनेट सुविधा स्वस्त दरात उपलब्ध करून देणे.

3. ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही किंवा असेल तर ते खूप कमी प्रमाणात आहे अशा ठिकाणी ही सुविधा पुरविणे.

4. या योजनेमुळे डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना मिळेल तसेच जास्तीत जास्त ग्रामीण भागातील नागरिक इंटरनेट सोबत जोडले जातील.

5. लोकांची जिवंत शैली सुधारून त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

6. डिजिटल इंडिया मोहिमेला प्रोत्साहन मिळेल.

 

पीएम वाणी योजनेची वैशिष्ट्ये Features of PM Vani Yojana

प्रत्येक योजना राबवण्यामागे काही ना काही वैशिष्ट्ये असते त्या योजनेची वैशिष्ट्येही आपल्याला माहिती असायला हवी. या योजनेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत.

1. योजना अतिशय जलद बनवण्याच्या उद्देशाने या योजनेअंतर्गत अर्ज प्राप्त झाल्यानंतर सात दिवसाच्या आत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

2. या योजनेअंतर्गत सार्वजनिक डेटा कार्यालय ओपन करण्यात येईल.

3. या योजनेअंतर्गत शेवटच्या घटकांना लाभ देण्यात येईल.

4. या योजनेअंतर्गत अंमलबजावणी ही जास्त भाव दुकानाच्या माध्यमातून करण्यात येत असल्यामुळे रास्त भाव दुकानदार वाय-फाय राऊटर खरेदी करतील आणि दुकानांमध्ये बसतील.

5. या योजनेअंतर्गत वापरण्यात येणाऱ्या डाटावर आकारण्यात येणारा दर सरकारने ठरवलेला नाही.

PM wani Yojana अंतर्गत वरील वैशिष्टे आहेत.

हे नक्की वाचा:- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

पीएम वाणी योजनेअंतर्गत लाभार्थी कोण असणार?

पीएम वाणी योजना अंतर्गत खालील लाभार्थी असणार आहेत त्याचबरोबर कशाप्रकारे लाभ होईल याची सुद्धा माहिती दिलेली आहे.

1. पीएम वाणी योजना अंतर्गत जास्त भाव दुकानाच्या 200 मीटरच्या आसपासच्या परिसरातील कोणताही नागरिक या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतो.

2. या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना अत्यंत कमी दराने सुविधा पुरविण्यात येईल.

3. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना ज्यांची उत्पन्न कमी आहे अशा कुटुंबातील मुलांना इंटरनेट सेवेचा लाभ मिळेल जेणेकरून त्यांना अभ्यास तसेच इतर बाबीं करिता या इंटरनेट सेवेचा फायदा मिळेल.

4. गरीब घरातील विद्यार्थी इंटरनेट सेवेचा लाभ घेऊन ऑनलाईन क्लासेस करू शकतील.

5. गावातील जास्तीत जास्त व्यक्तींना लाभ देण्यात येईल.

Pm Wani Yojana अंतर्गत वरील प्रमाणे लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे.

 

पीएम वाणी योजनेचे महत्त्व व फायदे कोणते आहेत?What are the importance and benefits of PM Wani Yojana?

आपल्या महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणारी पीएम वाणी योजना ही एक महत्त्वपूर्ण अशी सरकारी योजना असून या योजनेचे खालील महत्त्व व फायदे आहेत. Pm Wani Scheme Maharashtra

1. पीएम वाणी योजना भारत सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेला सहकार्य करत आहे.

2. पीएम वाणी योजनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न नक्कीच पूर्ण होण्यास मदत होईल.

3. पीएमवाणी योजनेच्या अंतर्गत लोकांना वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळे या योजनेमुळे मोठी क्रांती होण्यास मदत होईल.

4. या योजनेमुळे व्यवसाय तसेच उद्योगाला प्रोत्साहन मिळणार आहे.

5. या योजनेमुळे ग्रामीण भागामध्ये तसेच शहरी भागामध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे.

6. ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना एक प्रकारे वरदानच ठरणार आहे.

7. या योजनेमुळे घरोघरी इंटरनेटच्या सुविधा उपलब्ध होतील.

8. ही योजना केंद्र सरकारच्या वतीने संपूर्ण देशभरात सुद्धा राबविण्यात येत आहे.

PM Wani Yojana FAQ:

ही योजना फक्त महाराष्ट्रात सुरू आहे का?

पी एम वाणी योजना ही केंद्र शासनाच्या वतीने संपूर्ण भारत देशात राबविण्यात येणार आहे.

ही योजना कश्या द्वारे राबविण्यात येणार

ही योजना शासनाच्या वतीने राबविण्यात येणार असून या योजनेची अंमलबजावणी ही रास्त भाव धान्य दुकानांच्या मार्फत करण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत कोणत्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार ?

या योजनेअंतर्गत वायफाय सुविधा अत्यंत कमी दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अशाप्रकारे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पीएम वाणी योजना Pm Wani Scheme Maharashtra 2022 ही ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना तसेच त्यांच्या मुलांना डिजिटल बनवणारी एकंदरीतच संपूर्ण देशाला डिजिटल इंडिया च्या दृष्टीने समोर देणारी महत्वपूर्ण अशी योजना आहे. ही योजना अतिशय अल्प दरात राबविण्यात येत असल्यामुळे जास्तीत जास्त ग्रामीण भागातील गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना याचा लाभ मिळवता येईल.