QR कोड म्हणजे काय? QR Code चे फायदे, तोटे | QR Code Information in Marathi

मित्रांनो आपण प्रत्येक जागी QR Code पाहत आहोत. QR Code हे एक महत्त्वपूर्ण असे साधन आहेत, यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची माहिती साठवून ठेवू शकतो. आणि त्या QR Code लास्ट स्कॅन करून ती माहिती मिळवू शकतो. आपल्याला QR Code हा दुकानांमध्ये, एखाद्या वस्तूवर, त्याच्या लेबलवर तसेच जाहिरातीवर उत्पादनावर किंवा होर्डिंग वर दिसतो. यामध्ये विशिष्ट प्रकारची माहिती साठवून ठेवलेली असते. आणि ही माहिती अत्यंत सुरक्षितपणे साठवलेली असते. QR Code चा वापर पेमेंट रिसीव करण्याकरिता सुद्धा केला जातो. आजच्या या पोस्टमध्ये आपण QR कोड म्हणजे काय? QR Code चे फायदे, तोटे व QR Code वापरून पेमेंट कसे करावे? QR Code Information in Marathi याविषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. QR Code Mahiti Marathi 

क्यूआर कोड म्हणजे काय आहे? What is QR Code in Marathi

मित्रांनो आपल्याला सर्वत्र QR कोड पाहायला मिळत आहे. अनेक दुकानांमध्ये किंवा कोड दर्शनी भागामध्ये लावलेला असतो. QR Code वेगवेगळ्या प्रकारे तयार करण्यात येतात, तसेच ज्यांनी तो बनविलेला आहे ते त्यांच्या उत्पादनांची किंवा प्रॉडक्टची माहिती त्या QR Code मध्ये साठवून ठेवत असतात. QR Code मध्ये जी माहिती साठवून ठेवण्यात येते त्या माहितीला आपण डायरेक्टली पाहू शकत नाही. ती माहिती सुरक्षित आहे त्यासाठी ठेवलेली असते. QR Code मधील माहिती ला पाहण्यासाठी आपल्याला त्याला स्कॅन करावी लागते. क्यूआर कोडमध्ये कोणतीही माहिती तसेच कोणताही मजकूर किंवा एखादी लिंक म्हणजेच url साठवून ठेवता येते. QR Code Information in Marathi

क्यूआर कोड चे फुल फॉर्म हे ‘Quick Response Code’ असे आहेत. Quick Response Code हा बॉक्स प्रमाणे तयार करण्यात येतो. तो स्क्वेअर आकाराचा असतो. QR CODE ला जपान या देशाने विकसित केलेले आहे. बारकोड पेक्षा जास्त माहिती QR Code मध्ये साठवण्यात येते. QR Code हे बारकोड पेक्षा अधिक विकसित आहे. आज-काल क्यू आर कोड ला डिजिटल पेमेंट करण्याकरिता जास्तीत जास्त वापरण्यात येत आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या दुकानांमध्ये तुम्हाला क्यू आर कोड असलेली पाटी दिसेल. त्या क्यू आर कोड च्या माध्यमातून ते विक्रेते व्यवसायिक पेमेंट रिसिव्ह करत असतात. क्यू आर कोड ला आपण आपल्या मोबाईलच्या साह्याने स्कॅन करू शकतो. QR Code Mahiti Marathi, QR Code in Marathi

 

क्यू आर कोड मध्ये कोणत्या प्रकारची माहिती साठवली जाते?

QR CODE ही एक ‘Image-based hypertext link’ आहे. QR CODE चा वापर आपण ऑफलाइन मध्ये देखील करू शकतो. क्यू आर कोड मध्ये आपण URL Encode करू शकतो. कोणत्याही प्रकारचा डाटा, पेमेंट इन्फॉर्मेशन तसेच यूआरएल लिंक अशा प्रकारची कुठलीही माहिती आपण क्यू आर कोड मध्ये साठवून ठेवू शकतो, अक्षरे, संख्यात्मक आणि बायनरी डेटा एन्कोड करू शकतो. तेही सुरक्षित रित्या. ज्या व्यक्तीला क्यू आर कोड मधील माहिती मिळवायची आहे त्यांनी तो क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे. त्यानंतर हवी असलेल्या माहितीपर्यंत पोहोचता येते. QR Code in Marathi

 

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास आपण फोन पे किंवा गुगल पे किंवा इतर कोणत्याही प्रकारची यूपीआय ॲप वापरतो. त्यामध्ये आपण आपल्याला पेमेंट रिसीव करण्याकरिता क्यू आर कोड क्रिएट करू शकतो. आपण तो क्यू आर कोड जनरेट केल्यानंतर इतर कोणताही व्यक्ती आपल्या क्यू आर कोड ला स्कॅन करून डायरेक्टली आपल्याला पैसे पाठवू शकतो.

 

क्यू आर कोड ची वैशिष्ट्ये Features of QR Code

अनेक कार्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला क्यू आर कोड ची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत.

1. क्यू आर कोड मध्ये समावलेली माहिती अत्यंत सुरक्षित असते. आपण आपल्या डोळ्यांनी ती माहिती पाहू शकत नाही. क्यू आर कोड मध्ये समाविष्ट असलेली माहिती पाहण्यासाठी आपल्याला तो क्यूआर कोड स्कॅन करावा लागतो.

2. आपण आपल्या मोबाईल वरून सहजपणे क्यू आर कोड स्कॅन करू शकतो.

3. क्यू आर कोड मध्ये आपण अक्षरे, संख्यात्मक आणि बायनरी डेटा एन्कोड करू शकतो.

4. इतर बारकोड पेक्षा क्यू आर कोड हा जास्त वेगाने स्कॅन होतो. हा अधिक वेगवान आहे.

5. इतर कोड पेक्षा जास्त प्रमाणात क्यू आर कोड मध्ये डेटा सामावल्या जाते.

हे नक्की वाचा:- इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे?

क्यू आर कोड चा वापर कोणत्या ठिकाणी आणि कसा केला जातो? Use of QR Code in Marathi

क्यू आर कोड हे महत्वपूर्ण अशी माहिती साठवून ठेवणारे साधन आहे. आता आपण क्यू आर कोड चा वापर कोणत्या ठिकाणी आणि कशा प्रकारे केला जातो याविषयी माहिती जाणून घेऊया.

तसे पाहिल्यास क्यू आर कोड हे कोणत्याही ठिकाणी वापरता येते. व्यवसाय क्षेत्रामध्ये तसेच जाहिरात क्षेत्र, विपणन क्षेत्र, संप्रेषण व शिक्षण आणि तंत्रज्ञान या प्रकारच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर QR Code वापरला जातो. अनेक प्रकारच्या जाहिरातीमध्ये त्या जाहिरात करणाऱ्या कंपन्या त्यांचा QR Code प्रसिद्ध करतात. त्यांचे ग्राहक त्या QR Code ला स्कॅन करून त्यांच्या वेबसाईटवर जाऊ शकतात. बऱ्याच वेबसाईट मध्ये लॉगिन करण्याकरिता QR Code स्कॅन करावा लागतो त्यानंतर आपण त्या वेबसाईट मध्ये लॉगिन होऊ शकतो. आपल्या भारतासारख्या देशामध्ये आपण QR Code चा वापर पेमेंट रिसिव्ह करण्यासाठी केला जातो. जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला आपला नंबर न देता त्यांचा नंबर मिळवायचा असेल तर आपण त्यांचा किंवा कोड स्कॅन करून डायरेक्टली त्यांचा नंबर मिळवू शकतो. म्हणजेच क्यू आर कोड चा वापर आपण कशा प्रकारे करायचा हे आपल्यावर निर्भर आहे. क्यू आर कोड च्या मदतीने आपण आपली सोशल प्रोफाईल असेल किंवा पत्ता किंवा लोकेशन हे देखील शेअर करू शकतो. जर आपण व्यवसायिक असाल बिजनेस मॅन असाल तर आपल्या व्यवसायाची माहिती QR Code मध्ये समाविष्ट करून ती इतरांना देऊ शकतो.

 

QR Code चे फायदे Benifits of QR Code in Marathi

क्यू आर कोड चे फायदे खालील प्रमाणे आहेत.

1. QR Code हे अगदी सहजपणे कोणीही तयार करू शकतो.

2. क्यू आर कोड मध्ये समाविष्ट असलेली माहिती अत्यंत सुरक्षित असते.

3. QR Code मध्ये समाविष्ट असलेली माहिती अतिशय जलदपणे मिळवता येते.

4. क्यू आर कोड च्या सहाय्याने आपण आपला मोबाईल नंबर न देता पेमेंट रिसीव करू शकतो.

5. क्यू आर कोड स्कॅन करण्याकरिता किंवा तयार करण्याकरिता कोणत्याही प्रकारचे पैसे लागत नाही.

हे नक्की वाचा:- सिबिल स्कोर म्हणजे काय? त्याचा उपयोग कुठे होतो?

QR कोड वापरण्याचे तोटे Disadvantages of QR Code:-

मित्रांनो कोणत्याही गोष्टीचे ज्याप्रमाणे फायदे असतात त्याचप्रमाणे तोटे सुद्धा असतात. क्यू आर कोड चे सुद्धा काही तोटे आहेत ते आता आपण जाणून घेऊया.

1. क्यू आर कोड मध्ये काही धोकादायक गोष्टी देखील समाविष्ट केल्या जाऊ शकतात.

2. क्यू आर कोड मध्ये समाविष्ट माहितीमध्ये बदल करण्याचा धोका असतो.

3. क्यू आर कोड मध्ये सुरक्षेचा मुद्दा आहे.

 

QR Code कसा स्कॅन करावा How to Scan QR Code?

क्यू आर कोड स्कॅन करण्याकरिता खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी. How to Scan qr code information in Marathi

QR Code स्कॅन करण्याकरिता तुमच्याकडे मोबाईल असावा लागतो. जर तुमच्याकडे मोबाईल असेल तर तुमच्या मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोअर वरून QR Code स्कॅन करण्यास संबंधित एप्लीकेशन डाउनलोड करून घ्या. किंवा जर तुमच्या मोबाईल मध्ये स्कॅन ॲप्लिकेशन असेल तर आपण त्याचा वापर करू शकतात. आता ते आपलिकेशन ओपन केल्यानंतर कॅमेरा ओपन होईल. तुमच्या मोबाईलच्या कॅमेरासमोर तो किंवा कोड ठेवा. त्यानंतर तुमचा मोबाईल त्याला आपोआप स्कॅन करेल. आणि तुम्हाला हवी असलेली माहिती क्षणात तुमच्या मोबाईल मध्ये ओपन होईल.

अशाप्रकारे आपण आजच्या या पोस्टमध्ये QR Code संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. ही माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर, इतरांना देखील नक्की शेअर करा.