शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण असे अपडेट आलेले आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत रब्बी पिक विमा 2022 अर्ज सुरू झालेले आहेत. पिक विमा योजना अंतर्गत रब्बी हंगाम 2022 23 करिता ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याचप्रमाणे पिकपेरा प्रमाणपत्र डाऊनलोड कसे करायचे? या संदर्भात विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेत आहोत.
रब्बी हंगाम पिक विमा योजना Pik Vima Online Form
पिक विमा योजना रब्बी हंगाम 2022 ऑनलाईन फॉर्म Pik Vima Online Form भरणे सुरू झालेल्या असून ज्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचा पिक विमा उतरवायचा आहे. त्यांनी पिक विमा योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करायची आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अंतर्गत आपण रब्बी पिकांचा पिक विमा काढून आपल्या शरीरातील पिकांना विमा संरक्षण मिळवून देऊ शकतो. त्यामुळे जर कोणत्याही कारणाने आपल्या शेती पिकांचे नुकसान झाल्यास आपल्याला नुकसान भरपाई मिळवण्याकरिता पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा कंपनीकडे दावा दाखल करता येतो.
पिक विमा योजना ही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये त्यांच्या शेती पिकांना सुरक्षा कवच प्रदान करण्याकरिता पिक विमा योजना आपल्या महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पिक विमा योजना राबवण्याकरिता विविध कंपन्यांची निवड करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा योजना अंतर्गत रब्बी पिक विमा Crop Insurance काढायचा असेल त्यांनी लवकरात लवकर पिक विमा काढण्याची आवाहन करण्यात येत आहे.
रब्बी हंगाम 2022 करिता पिक विमा अर्ज आपण आपल्या मोबाईलच्या साह्याने सुद्धा भरू शकतो किंवा जवळच्या सीएससी सेंटर वर जाऊन देखील आपल्याला पिक विमा अर्ज सादर करता येतो. जर तुमच्या जवळपास कोणतेही सीएससी सेंटर नसेल तर शेतकऱ्यांना स्वतः पिक विमा फॉर्म भरता येतो.
रब्बी पिक विमा ऑनलाईन फॉर्म 2022 महाराष्ट्र Rabbi Pik Vima Online Form Maharashtra
प्रधानमंत्री पिक विमा योजना Rabbi Pik Vima Maharashtra 2022 अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना रब्बी पिकांचा पिक विमा काढायचा असेल त्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या पोर्टल वर जाऊन अर्ज करायचा आहे. शेतकरी बांधवांना रब्बी पिक विमा ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा कॉमन सर्विस सेंटर वर जाऊन अर्ज करता येणार आहे. पिक विमा कंपनीच्या मार्फत शेतकऱ्यांना स्वतः अर्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पिक विमा अर्ज आपण मोबाईलवर त्याचप्रमाणे कम्प्युटरवर किंवा लॅपटॉप वर भरू शकतो.
रब्बी पिक विमा 2022 अर्ज प्रक्रिया Application Process for Rabbi Pik Vima 2022
शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पिक विमा योजना(pik vima yojana maharashtra) अंतर्गत रब्बी पिक विमा 2022 करिता अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम आपल्याला सीएससी आयडी मध्ये लॉगिन करायचे आहे. त्यानंतर पिक विमा हा शब्द सर्च बॉक्स मध्ये टाईप करा. आता तुमच्या समोर प्रधानमंत्री पिक विमा योजनेची ऑफिशियल वेबसाईट आली आहे त्यावर क्लिक करा किंवा तुम्ही डायरेक्ट पिक विमा योजनेच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करा यावर क्लिक करून लॉगिन करू शकता. आता तुम्हाला ज्या शेतकऱ्याचा रब्बी पिक विमा काढायचा आहे त्यांची संपूर्ण माहिती प्रविष्ट करायचे आहे त्याचप्रमाणे पिक पेरा प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहे. त्यानंतर पेमेंट पूर्ण करायचे आहे आता तुमच्यासमोर एक पावती जनरेट झालेली असेल ती प्रिंट करून शेतकऱ्यांना द्यावी.
रब्बी पिक विमा 2022 कागदपत्रे Documents For Rabbi Pik Vima 2022
पिक विमा ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता शेतकऱ्यांच्या जवळ त्यांच्या शेती पिकांचा सातबारा ज्या शेताचा आपण पिक विमा काढणार आहात त्या शेताचा सातबारा तसेच आठ अ व पिक पेरा प्रमाणपत्र त्याचप्रमाणे बँक पासबुकची झेरॉक्स ही कागदपत्रे असायला पाहिजे.
रब्बी पिक विमा करिता पिक पेरा प्रमाणपत्र Pik Pera Form
शेतकरी मित्रांनो रब्बी पिक विमा 2022 ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता शेतकरी मित्रांना पिक पेरा स्वयंघोषणापत्र म्हणजेच पिक पेरा प्रमाणपत्र अपलोड करावे लागत असते. पिक तेरा प्रमाणपत्र मध्ये आपण आपल्या शेतामध्ये पिकवत असलेल्या शेती पिकांची माहिती द्यावयाची असते. पिक विमा योजनेअंतर्गत अर्ज करणारा प्रत्येक शेतकऱ्याला पिक पेरा प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करावेच लागते.
पिक पेरा प्रमाणपत्र डाउनलोड कसे करायचे? How to Download Pik Pera Form
शेतकरी मित्रांनो रब्बी पिक विमा 2022 ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता आवश्यक असलेले पीक पेरा प्रमाणपत्र आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला ते पीक पेरा स्वयंघोषणापत्र डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे त्यानंतर त्यावर विचारलेली सर्व माहिती व्यवस्थितपणे भरून पिक विमा ऑनलाईन फॉर्म भरताना अपलोड करायचे आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना संदर्भातील रब्बी पिक विमा 2022 ऑनलाईन फॉर्म ही माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. अशाच महत्वपूर्ण माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.