कथा म्हणजे काय एका वाक्यात उत्तरे लिहा?www.marathihelp.com

कथा म्हणजे काय ?
कथा म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा.

"कथेमध्ये घटना असतात. या घटनांना एखादया सूत्रानुसार गुंफण्यासाठी कथानक असते. कथानकात पात्रे असतात. वास्तवातल्या माणसांसारखीच ही पात्रे चित्रित केलेली असतात. वास्तवातली माणसे जशी एकमेकांशी वागतात, तशीच पात्रेसुद्धा एकमेकांशी वागतात. ती एकमेकांशी भांडतात. एकमेकांना मदत करतात. एकमेकांवर प्रेम करतात. राग, लोभ, प्रेम, असूया, दया, सहानुभूती वगैरे भावभावना वास्तवातल्या माणसांमध्ये असतात. तशाच भावभावना पात्रांमध्येही असतात. पात्रांच्या एकमेकांशी वागण्यातून घटना निर्माण होतात. तसेच, कथेमध्ये स्थळ, काळ, वेळ यांचेही चित्रण केलेले असते. कथेच्या विषयानुसार वातावरण असते. पात्रांच्या परस्परांशी वागण्यातून ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत निर्माण होते. या सर्व घटकांनी युक्त अशी रचना घेऊन कथा निर्माण होते. तिला समर्पक शीर्षक मिळाले की कथा परिपूर्ण होते.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 13:17 ( 1 year ago) 5 Answer 5692 +22