दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम काय झाला?www.marathihelp.com

दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम काय झाला?

युरोपकेंद्रित राजकारणाचा शेवट
एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकापर्यंतचा काळ हा युरोपकेंद्रित कालखंड मानला जातो.दुसऱ्या महायुद्धदरम्यान जर्मनी,फ्रान्स आणि इटली ही यूरोपमधील महत्त्वाची राष्ट्रे पराभूत झाली होती.युनायटेड किंग्डम उद्ध्वस्त झाले होते.दुसरीकडे,अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या बड्या सत्ता म्हणून उदयास आल्या.युरोपीय सत्तांचे महत्त्व कमी झाल्यामुळे आता जग हे युरोप केंद्रित राहिले नाही. अमेरिका आणि सो्हिएत रशिया यांचे महत्त्व वाढल्यामुळे युरोपीय राष्ट्रांचे(देशांचे) महत्त्व कमी झाले.

युरोपची विभागणी
दुसऱ्या महायुद्धादरम्यान सोव्हिएत रशियाच्या सैन्याने पूर्व युरोपचा प्रदेश व्याप्त केला होता.पश्चिम युरोपवर अमेेरिका,फ्रान्स व युनायटेड किंग्डम या पाश्चात्त्य राष्ट्रांनी ताबा मिळवला होता.जर्मनीच्या पराभवानंतर दोन्ही बाजूंना आपापल्या प्रदेशावर ताबा कायम ठेवायचा होता.म्हणूनच युद्ध संपले तेव्हा युरोपचे पूर्व आणि पश्चिम असे विभाजन झाले.

विचारप्रणालीचे कार्य
रशियातील १९१७ च्या बोलशेविक क्रांतीने आंतरराषट्रीय संबंधात विचार प्रणाली हा एक नवीन घटक आणला होता.या क्रांतीनंतर सोव्हिएत रशियाची साम्यवादी राष्ट्र म्हणून निर्मिती झाली.सोव्हिएत रशियाच्या अधिपत्याखाली असलेल्या पूर्व युरोपीय राष्ट्रांनी साम्यवादी विचारप्रणाली मान्य केली तर अमेरिकेच्या प्रभावाखाली असलेल्या पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी भांडवशाही व्यवस्था मान्य केली. आता युरोपच्या विभागणीला या विचार प्रणालीचे नवीन अंग प्राप्त झाले होते.

संयुक्त राष्ट्रांची स्थापना
१९४५ मध्ये संयुक्त राष्ट्राची स्थापना ही एक महत्त्वाची घटना होती.शांतता व स्थैर्य राखण्यासाठी या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना केली गेली होती. आता राष्ट्रसंघाच्या जागी संयुक्त राष्ट्र हे काम करणार होते.

आशियाचा उदय
या काळातील आणखी एक महत्त्वाचा प्रवाह म्हणजे आशिया व आफ्रिकेतील वसाहतवाद विरोधी किंवा स्वातंत्र्याच्या लढ्यात यांचे यश.त्यातूनच पुढे आशिया व आफ्रिकेतील देश स्वतंत्र होऊ लागले.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 12:19 ( 1 year ago) 5 Answer 6156 +22