पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारे शेतीला काय म्हणतात?www.marathihelp.com

पावसाच्या पाण्यावर होणारी शेती ला काय म्हणतात?
जिरायती अवस्थेत उत्पादन अडसुरे म्हणतात, की केवळ पावसाच्या पाण्यावर माझी हंगामी पिकांची शेती आहे. त्या व्यतिरिक्त पाण्याचा अन्य कोणताही स्रोत नाही. हरभऱ्याचे पीकही सुमारे एक ते दोन पाण्यातच येते.

भारताच्या भूभागापैकी बराच मोठा भाग हा कोरड्या व अर्धकोरड्या हवामान असणाऱ्या क्षेत्रात मोडतो. पावसाचे प्रमाण कमी असणाऱ्या या भागात लोकसंमत पध्दतीने पावसाच्या पाण्यावर शेती करणे खुपच अवघड जाते. तरीही या भागात राहणाऱ्या लोकांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. वारंवार येणाऱ्या दुष्काळामुळे या भागातीस पिकांचे नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर होत असते. या भागातील प्रती हेक्टर कृषी उत्पादन देशाच्या तुलनेत फारच तमी आहे. जिरायत शेती हा आर्थिक अडचणीत लोटणारा व्यवसाय होत आहे. अपुरे पाणी ही कोरडवाहू शेतीची सर्वात मोठी समस्या आहे. याशिवाय कीटक, रोग, हवामान, वारा, उषणता, माती हे घटकही कोरडवाहू शेतीमध्ये उत्पादन घेण्यासाठी प्रतिकूल परिणाम करीत असतात. अशा पध्दतीने शेती केल्यामुळेही शेतकरी नुकसान ओढवून घेत असतो. अज्ञानामुळे किंवा पुरेसे महत्त्व न दिल्यामुळे उपलब्ध नैस्रगिक संसाधनांचा कार्यक्षम वापर केल्या जात नाही, परिणामी शेती व्यवहार तोड्यात जातो.

जिरायत शेतीत अधिक उत्पादन घेण्यासाठी, कमी पाऊस असतांना ओलावा जमिनीत धरून ठेवणे, वेगात पाऊस असतांना वाहून जाणारे पाणी शेत जमिनीच्या बाहेर सुरक्षितपणे काढणे व जल संधारण करून मातीतील ओलावा वाढविणे अत्यंत महत्त्वाचे असते. पीक उत्पादन वाढविण्याचे दृष्टीकोनातून उपलब्ध पाऊसपाण्याचे व त्यामुळे जमिनीत निर्माण होणाऱ्या ओलाव्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास वाढत्या लोकसंख्येस लागणाऱ्या अन्नधान्याची गरज त्याच क्षेत्रातून बऱ्यापैकी पुरविणे शक्य होईल.

पाऊस पाण्याचे व्यवस्थापन :

जिरायत शेतीत पाण्याचे व्यवसथापन करणे व कार्यक्षम वापर करणे हे एक फार मोठे आव्हान आहे. पाणी व्यवस्थापनाचा प्रमुख उद्देश पाऊस पाण्याची साठवण, व जमिनीची सुपिकता नष्ट होऊ न देता साठविलेल्या व भूजल पाण्याचा कार्यक्षम वापर हा आहे.

पिकाची निवड :

जिरायत क्षेत्रात लागवडीसाठी योग्य पिकाची निवड करणे फार महत्त्वाचे आहे. भरपूर पाऊस असणाऱ्या अथवा बागायती क्षेत्रात यशस्वी पिकांच्या जाती जिरायत क्षेत्रात उत्पादन देऊ शकत नाहीत. जिरायत क्षेत्रासाठी पीक निवडतांना पुढील बाबी विचारात घ्याव्यात.

- कमी कालावधीची व पानाचे क्षेत्रफळ कमी असणाऱ्या जाती निवडाव्या जेणे करून पर्णात्सर्जन कमी असेल. खोलवर मुळे जाणाऱ्या व भरपूर मुळे असणाऱ्या जाती विस्तारीत क्षेत्रातून ओलावा व अन्नद्रव्ये घेण्यास सक्षम असतात.

- वर्षातील अती उष्ण व अती कोरडे हवामान सुरू होण्यापूर्वी पूर्ण वाढ झटपट होणाऱ्या जाती, जमिनीतील ओलावा मर्यादेपेक्षा कमी होण्यापूर्वीच या पिकांची कापणी पूर्ण होते.

क्षेत्र शेतीचे :

केवळ पावसाचे पाणी जमिनीत जिरवून करण्यात येणाऱ्या पिकांना जिरायत क्षेत्रातील पिके असे म्हणता येईल. परंतु यातील बहुतेक पिकांच्या पियांना रूजण्यासाठी अथवा कलमी काड्यांपासून नवीन रोप तयार होतांना सर्वसाधारण ओलावा आवश्यकच असतो. वारंवार येणाऱ्या दुष्काळामुळे जिरायत शेतीत मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या नुकसानी तीव्रता कमी करण्यासाठी शेतीमध्ये खालील बाबींना विशेष महत्त्व दिले पाहिजे.

शेताची बांध बंदिस्ती :

शेताची बांधबंदिस्ती जिरायत शेतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जमिनीचे सर्वेक्षण करून प्रत्येक 30 मीटर अंतरावर समतल रेषा दर्शीविणारा नकाशा सर्वप्रथम काढून घ्यावा. प्रत्येक 60 सेंटी मीटर उभ्या उतारास 20 ते 30 सेंटी मीटर उंचीचा आडवा बांध घातला पाहिजे. शेत जमिनीस फारसा उतार नसला तरीही प्रत्येक 75 ते 80 मीटर अंतरावर बांध घालणे उपयुक्त आढळून आले आहे. वादळी पावसाचे पाणी सुरक्षितपणे शेताबाहेर काढून देण्यासाठी माती बांधात ठिकठिकाणी दगडी सांडवे बांधले पाहिजे. या सांडव्याची उंची माती बांधापेक्षा निम्मी ठेवावी. त्यामुळे पावसाचे जादा पाणी सांडव्यावरून शेताबाहेर जातांना मातीचा सुपीक थर वाहून नेणार नाही. क्ष्या क्षेत्रातील वैसर्गिक नाले पूर्णत: बंद करू नये. पाणी शेताबाहेर काढून देण्यासाठी योग्य आकाराचे मार्ग देऊन त्यावर नियंत्रण ठेवावे. ज्यायोगे वादळी पावसाचे जादा पाणी हळूवारपणे व सुरक्षितपणे शेताबाहेर काढता येईल. गावठाणातील मुख्य प्रवाहाचे मार्ग सुस्थितीत ठेवावे. जेणे करून शेताबाहेर काढून दिलेल्या पाण्याला दूर वाहून नेण्यासाठी मार्ग उपलब्ध असेल.

समतल रेषेवर पेरणी :

समतल रेषेवर पेरणी केल्यामुळे धूपेस प्रतिबंध होतो. पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यास मदत होते. सर्व रोपांना सारखा ओलावा मिळाल्यामुळे रोपांची सारखी वाढ होते व पिकांचे उत्पादन वाढते.

पिकांची फेरपालट :

पिकांची फेरपालट केल्यामुळे जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यास मदत होते. पिके मातीची धूप थांबवू शकतात व जी पिके धूप थांबवू शकत नाहीत अशी पिके आलटून पालटून लावली जातात.

पट्टा पिक पध्दती :

वादळी पावसामुळे जमिनीची धूप होते. वाहून जाणारे पाण आपल्या समवेत मातीचा सुपीक थर वाहून नेतो. पटटा पिक पध्दती मध्ये वाहून जाणाऱ्या पाण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे मजमिनीत पाणी मुरण्यासाठी जास्तीची संधी उपलब्ध होते. वाहून जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होते. माती अडते. भरपूर पाने असणाऱ्या पिकांच्या लागवडीमुळे पावसाचे थेंब आधी आदळतात व नंतर जमिनीवर पडतात त्यामुळे पावसाचे थेंब जमिनीवर आदळून होणाऱ्या धूपेस प्रतिबंध होतो. जमिनीतील ओलावा पिकास जास्त काळ उपलब्ध झाल्यामुळे पिकांचे उत्पादनात वाढ होते. सर्वच पिके धूप प्रतिबंधक नसतात. त्यामुळे पिकांच्या काही ओळी नंतर धूप प्रतिबंधक पिकांच्या तीन चार ओळी लावल्यामुळे जमिनीची सुपिकता टिकवून पिकांचे उत्पादनही घेता येते.

तण नियंत्रण व कोळपणीचे तंत्र :

शाश्वत शेती उत्पादनासाठी पावसाचे पाणी जमिनीत जास्तीत जास्त शोषून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक पावसाच्या सरी नंतर हलकी नांगरट व त्यामागोमाग कोळपणी करून जमीन मोकळी करतात. यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. मशागतीमुळे निर्माण झालेला मऊ मातीचा थर आच्छादनाचेही काम करतो. त्यामुळे बाष्पीभवनाने जमिनीतील ओलावा उडून जाण्यास प्रतिबंध होतो. त्याशिवाय कोळपणी अथवा वखरणी केल्यामुळे तणांचा बंदोबस्त होतो. शेतातील तणे जमिनीतील अन्नद्रव्ये व ओलावा शोषून घेत असतात. शेतातील तणे अन्नद्रव्ये व ओलावा मिळविण्यासाठी पिकाशी स्पर्धा करीत असतात त्यामुळे त्यांचे प्रभावी नियंत्रण करणे आवश्यक असते.

आंतरमशागतीमुळे तण काढण्याच्या मजुरीत बचत होते, पिकांचे व तणांचे मृत अवशेष जमिनीत गाडले जातात. यावर उपयुक्त जीवाणू वाढतात. गाडल्या गेलेल्या सेंद्रिय पदार्थाचे रूपांतर हे जीवाणू नायट्रेट मध्ये करतात. त्यामुळे पिक वाढीच्या प्रत्येक अवस्थेत 10 ते 12 सेंटीमीटर खोल आंतरमशागत करावी. मशागतीच्या अवजारांचा वापर करण्यासाठी पिकांची पेरणी ओळीत करणे आवश्यक असते. ओळीत पेरलेल्या पीकांमध्ये आंतरमशागत करणे सोपे व कमी खर्चाची होते.

आच्छादनाचे तंत्र :

मातीतील ओलाव्याचा नाश कमी करण्यासाठी जमिनीवर आच्छादन करणे गरजेचे आहे. पिकांची काढणी झाल्यानंतर उर्वरित ताटे, धसकटे अथवा पाचट असे पिकांचे अवशेष जाळून नष्ट करण्याची प्रथा आहे. हे अवशेष खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात. या पासून चांगले सेंद्रिय खत निर्माण करता येते. पुढील पिकांसाठी आच्छादन म्हणून यांचा वापर केल्यास मातीतील ओलाव्याचा नाश प्रभावीपणे कमी करता येतो. कार्यक्षमतेने हे साध्य करण्यासाठी किमान एक टन प्रति हेक्टरी पिक अवशेषांचा आच्छदनाकरिता वापर केला पाहिजे. दोेन टन प्रति हेक्टरी पिक अवशेषांचा आच्छदनाकरिता वापर केल्यास चांगले लाभ मिळतात. हेक्टरी आठ टन प्रति हेक्टर पर्यंत हे लाभ वाढत जातात. 30 ते 40 टक्के पाणी या पध्दीने वाचविता येते. शिवाय आच्छादनाचे रूपांतर जागेवरच सेंद्रिय खतात होते. वाहत्या वाऱ्यांचा वेग 99 टक्के पर्यंत कमी करता येतो. पिक व तणांचे अवषेशामुळे पाणी जमिनीत मुरण्याच्या प्रक्रियेत वाढ होते, 2 ते 6 पटीने अपधाव कमी होते.

पीक लागवडीची योग्य वेळ :

जमिनीत खूप ओलावा किंवा जमीन खूप कोरडी असतांना पेरणी केल्यास उगवणीवर गंभीर परिणाम होतात. शुष्क किंवा अर्धशुष्क हवामान असणाऱ्या प्रदेशात जमिनीत ओलाव्याचे योग्य प्रमाण वर्षा ऋतूच्या सुरूवातीच्या काळात असते. ज्या दिवशी अशी स्थिती निर्माण (वापसा) होईल त्याच दिवशी पेरणी केली पाहिजे. बियाणे योग्य खोलीवर पडले पाहिजे. पृष्ठभागावरील ओलावा झटपट उडून जातो त्यामुळे वर पडलेल्या बियांना पुरेसा ओलावा न मिळाल्यामुळे रूजण्याची क्रिया होत नाही. शक्य तेव्हा 24 तास पाण्यात भिजवून व बिज प्रक्रिया करून लावावे. पाण्यात भिजविल्यामुळे अंकुरण लवकर होते. मुळांची वाढ लवकर झाल्यामुळे थरातील ओलावा रोपास घेता येतो.

ओळीत पेरणी :

पिकांची ओळीत पेरणी केल्यामुळे आंतरमशागत करणे सोयीचे होते. पावसाची प्रत्येक सर येऊन गेल्यानंतर जमीन कोळपून घ्यावी व त्यानंतर कोळप्यास दोरी बांधून रोपांच्या दोन ओळीत सरी तयार करावी. यामुळे ओलावा जमिनीत राहतो व पुढील पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. प्रत्येक पावसच्या सरीनंतर पुन:पुन: पिकांच्या दोन ओळीत वखरणी, डवरणी केल्यामुळे जमिनीतील ओलावा प्रभावीपणे धरून ठेवण्यास मदत होते.

पिक विमा :

कमी व अनियमित पावसाच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पिकांचा विमा नियमित उतरविलाच पाहिजे.

शेततळी :

शेतामध्ये व शेताच्या वरील भागात पडणारे पावसाचे पाणी साठवून त्या पाण्याचा उपयोग दोन पावसात मोठा खंड असतांना अथवा पावसाळा संपल्यानंतर शेतीसाठी करता येतो. शिवाय जनावरांसाठी या पाण्याचा उपयोग होतो. या करीता शेततळी बांधून घ्यावीत.

solved 5
कृषि Tuesday 6th Dec 2022 : 10:26 ( 1 year ago) 5 Answer 4670 +22