भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय भावनिक बुद्धिमत्तेचे घटक स्पष्ट करा?www.marathihelp.com

स्वभावनांची यथायोग्य जाणीव होणे, स्वत:ची व इतरांचीही आंतरिक मन:स्थिती ओळखता येऊन भावभावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय.

मानवी मेंदू व भावना यांच्यातील विकास हा अर्भकाच्या टप्प्यापासूनच होत असतो आणि भावनिक बुद्धिमत्तेचा स्तर मानवी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर बदलत असतो.

सर्वप्रथम चार्ल्स रॉबर्ट डार्विन या विचारवंतांनी भावनिक बुद्धिमत्तेबाबत आपले विचार मांडले आहेत. भावनिक रित्या व्यक्त होणे हे तग धरून ठेवण्यासाठी आवश्यक आहे, असे ते म्हणतात. भावनिक बुद्धिमत्ता हा संशोधनात्मक व अभ्यासात्मक दृष्टीने नवीन विषय असून त्याचे मूळ डार्विन यांच्या सिद्धांतांमध्ये दिसून येते. त्यांच्या नंतर अनेक विचारवंतांनी भावनिक बुद्धिमत्तेवर आपले विचार मांडले आहेत. त्यामध्ये पीटर सॅलोव्हे आणि जॅक मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्ता या संज्ञेचा वापर केला. त्यांनी स्वतःच्या व इतरांच्या भावभावनांवर नियंत्रण व नियमन करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय, असे आपले मत व्यक्त केले. डॅनिअल गोलमन यांच्या मते, ‘स्वत:च्या भावनांवर आणि त्यांच्या अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवता येणे, आपल्या जवळील व्यक्तींसोबत सुसंवाद साधता येणे, स्वयंप्रेरणेतून व जीवनात ठरविलेल्या उद्दिष्टांनुसार कार्य करणे, वागण्यात व स्वभावात लवचिकपणा असणे या सर्व गुणात्मक मिश्रणाला भावनिक बुद्धिमत्ता म्हणतात‘. विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. एकूणच कोणत्याही व्यक्तीची भावनांचा वापर करून संवाद साधण्याची, घडलेल्या व केलेल्या सर्व घडामोडी स्मरणात ठेवण्याची, एखाद्या प्रसंगाचे वर्णन करण्याची, एखाद्या घटनेतून बोध घेण्याची, इतरांचे मत समजून घेण्याची, व्यक्तींना पारखण्याची, भावना समजून सांगण्याची आंतरिक क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय.

solved 5
General Knowledge Saturday 15th Oct 2022 : 08:58 ( 1 year ago) 5 Answer 924 +22