महसूल दिन म्हणजे काय?www.marathihelp.com

महसूल दिन म्हणजे काय?
दरवर्षी दिलेल्या उद्दिष्टाची पूर्तता करणार्‍या या यत्रणेतील कार्यरत अधिकार्‍यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या अपेक्षांच्या ओझ्यातून उतराई होण्याची संधी शासनाला मिळावी म्हणून दरवर्षी १ ऑगस्टला महसूल दिन साजरा केला जावा, अशी संकल्पना पुढे आली.


1 ऑगस्ट आज महसूल दिन आहे. शासनाच्या मध्यवर्ती विभाग म्हणून कार्यरत आहे. जमीन महसूल वसुल आणि कायदा व सुव्यवस्था राखणे या उद्देशाने सुरू झालेल्या या विभागात सध्या गौणखनिज स्वामित्वधन व अनधिकृत कारवाई, करमणूक कर, विविध खात्याची थकित वसुली, पाणी वापर परवानगी, रस्ता देणे, पाईपलाईन परवानगी, सर्व प्रकारच्या निवडणूका, जनगणना, आर्थिक गणना, कृषि गणना, आधार कार्ड, विविध सामाजिक योजना, रोजगार हमी योजना, जात,रहिवाशी,मिळकत ऐपत,राष्ट्रीयतव, जेष्ठ नागरीक, शेतकरी दाखला, भूमीहीन/अल्प भूधारक व इतर प्रमाणपञे, पाणी/ चारा टंचाई, सर्व प्रकार च्या नैसर्गिक आपत्ती, मोर्चा, उपोषण, रस्ता रोको, यासह शासनाकडून जे कोणतेही मोठे अभियान राबविले जातात त्याची जबाबदारी महसूल विभागावर आहे. कोणतेही कायदेशीर बंधन नसताना या विभागाचे अधिकारी/कर्मचारी दररोज दोन-तीन तास जास्त काम करतात. वर्षातील अर्ध्या पेक्षा जास्त सुट्टी च्या दिवशी कामकाज करतात. तथापि जनतेकडून त्यांना प्रोत्साहन तर दूर साधे सहकार्य मिळेनासे झाले आहे. प्रत्येकास अर्ज दिला की लगेच काम हवे आहे, कोणीही थांबायला तयार नाही. कार्यालयीन कार्यपद्धती ढासळतेय व कामाची गुणवत्ता कमी होतेय याकडे दुर्लक्ष केले जाते. हल्ली प्रत्येक अर्जदार अर्ज देतानाच आज/उदया शेवटची तारीख आहे म्हणून सांगतात. काम त्याच दिवशी व्हावे यासाठी विविध मार्गाचा वापर करतात. बदनाम माञ महसूल विभागास केले जाते. तरीही महसूल अधिकारी/कर्मचारी मोठया जोमाने काम करत आहेत. त्यांना जनतेकडून व इतर विभागाकडून योग्य सहकार्य मिळावे एवढीच अपेक्षा.
महसूल वर्षाचा पहिला दिवस महसूल दिन. यादिनी महसूल खात्याशी संबंधित यंत्रणेला अपेक्षित बाबींचा निवाडा होणे अपेक्षित; परंतु हा दिन साजरा करताना शासनाने अपेक्षिलेल्या मूळ उद्देशापासून भरकटत असल्याचे चित्र या दिवशी आयोजित होणार्‍या उपक्रमावरुन समोर येत आहे.

जसे १ एप्रिल ते ३१ मार्च हे आर्थिक वर्ष; तसेच १ ऑगस्ट ते ३१ जुलै हे महसूल वर्ष. या कालावधीच्या शेवटी वर्षभरातील महसूल आकारणी व वसुली यांचा ताळमेळ घेण्याचे काम महसुली यंत्रणेकडून केले जाते. त्यामुळे प्रत्येक नवे महसूल आकारणी व वसुलीचे उद्दिष्ट घेऊन राज्यातील सहा विभागीय आयुक्त कार्यालये, ३५ जिल्ह्ये, ३५८ तालुके, १८0 उपविभागीय अधिकारी कार्यालये, १५६४ महसूल मंडळे, तर १२ हजार ३६७ तलाठी साज्यात कार्यरत महसूलचे अधिकारी, कर्मचारी नव्या जोमाने काम करत असतात. दरवर्षी दिलेल्या उद्दिष्टाची पूर्तता करणार्‍या या यत्रणेतील कार्यरत अधिकार्‍यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या अपेक्षांच्या ओझ्यातून उतराई होण्याची संधी शासनाला मिळावी म्हणून दरवर्षी १ ऑगस्टला महसूल दिन साजरा केला जावा, अशी संकल्पना पुढे आली. या संकल्पनेत महसूलच्या कार्यरत यंत्रणेला पुढील उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी ऊर्जा मिळणारे काम महसूलदिनी व्हावे, हे उद्दिष्ट डोळ्य़ासमोर ठेवून राज्य शासनाने १९ जुलै २00२ रोजी महसूल दिन आयोजनासंदर्भात पहिले परिपत्रक काढले. या परिपत्रकानंतर महसूल दिन साजरा करणे सुरु झाले; परंतु आयोजन नेमके कसे करावे, याबाबत संबंधित गोंधळात असल्याने वर्षातील ३६४ दिवसात जी कामे ही यंत्रणा करते तीच कामे मेळावे, प्रत्यक्ष दारी जाऊन व्यापक प्रमाणात करण्यावर भर दिला गेला. त्यानंतर शासनाने महसूल दिनासंदर्भात २२ जुलै २00४ रोजी सुधारित परिपत्रक काढले. या परिपत्रकातही शासनाने महसूल दिनाचे महत्त्व अधोरेखीत आहे.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:42 ( 1 year ago) 5 Answer 3420 +22