व्यापारी शेती म्हणजे काय?www.marathihelp.com

व्यापारी शेती म्हणजे काय?

(१) ज्या शेती पद्धतीत व्यापारी हेतूने मोठ्या प्रमाणावर शेतीची उत्पादने घेतली जातात, त्या शेती पद्धतीला व्यापारी शेती म्हणतात.

(२) व्यापारी शेती होणाऱ्या प्रदेशात शेतांचे आकार १० ते १०० हेक्टर इतके मोठे किंवा त्यापेक्षाही जास्त मोठे असतात.

(३) समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात व्यापारी शेती केली जाते. २५ ५० सेमी पर्जन्यमान असलेल्या कोरड्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर मुख्यतः गव्हाची लागवड केली जाते. शिवाय मका, बार्ली, ओट, राय या पिकांचीही लागवड केली जाते.

(४) समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशातील प्रेअरी, स्टेप्स, व्हेल्ड, पंपास, कॅटनबरी यांसारख्या सुपीक गवताळ प्रदेशांत मोठ्या प्रमाणावर गव्हाचे उत्पादन घेतले जाते.

(५) विरळ व मध्यम लोकवस्तीच्या प्रदेशांत व्यापारी शेती असल्यामुळे तेथे
शेतमजूर फार महाग असतात. त्यामुळे अत्यंत आवश्यक असणाऱ्या कामांसाठीच शेतमजूरलावले जातात.

(६) व्यापारी शेतीची बहुतेक कामे यांत्रिक साधनांच्या साहाय्याने केली जातात. नांगरणी, पेरणी, कापणी, मळणी ही कामे एकत्रितरीत्या करणारी यंत्रे व ट्रॅक्टर्स यांचा सरांस वापर केला जातो. रासायनिक खते भरपूर प्रमाणात वापरली जातात. सुधारित बी-बियाण्यांचा वापर केला जातो. कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

(७) व्यापारी शेतीचे मुख्य उद्दिष्ट धान्य उत्पादनाची विक्री करणे हेच असते. त्यामुळे राष्ट्रीय व जागतिक बाजारपेठांत धान्य उत्पादने मोठ्या प्रमाणावर पाठवली जातात. (८) व्यापारी शेती असलेल्या प्रदेशात रस्ते व लोहमार्ग यांचे दाट जाळे असते.

solved 5
कृषि Monday 5th Dec 2022 : 15:58 ( 1 year ago) 5 Answer 4388 +22