संघटक सचिव म्हणजे काय?www.marathihelp.com

संघटक सचिव म्हणजे काय?

सचिव – अध्यक्षांना जरी मोठय़ा प्रमाणात अधिकार प्राप्त झाले असले तरीही सचिव हे पद अत्यंत महत्त्वाचे व जबाबदारीचे असते. या पदाला सर्व अधिकार प्राप्त झालेले असतात. त्यामुळे, त्या पदावरील व्यक्तीवर मोठय़ा प्रमाणात जबाबदाऱ्या केंद्रित करण्यात आल्या आहेत. देशाच्या पंतप्रधानपदास जेवढे महत्त्व असते, त्याच धर्तीवर सहकारी संस्थेमधील सचिव या पदास महत्त्व आहे. उपविधी क्रमांक १४१ मध्ये सचिवांच्या जबाबदारीविषयी विस्तृतपणे विवेचन करण्यात आले आहे. सभासदांकडील तसेच अन्य संबंधित व्यक्तींकडून येणारी पत्रे घेण्यापासून सर्वसाधारण सभा व व्यवस्थापक समितीच्या सभेपुढे अशी पत्रे निर्णयासाठी ठेवून त्यावर निर्णय घेण्यास चालना देणे, या निर्णयानुसार इतिवृत्ते लिहिणे, तसेच रजिस्टरमध्ये नोंदवून सर्व संबंधितांना पाठविणे इत्यादी सर्वच कामे सचिवपदावरील व्यक्तीला जबाबदारीने पार पाडावयाची असतात. त्याचप्रमाणे संस्थेच्या कायद्यानुसार अनिवार्य असलेल्या सर्व नोंदवह्य़ा, सभासद संचिका, दफ्तर इत्यादी जबाबदारीच्या कामांमध्ये ज्यांचा पुढे उल्लेख करण्यात आला आहे, अशी माहिती अद्ययावत व सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सचिवपदावरील व्यक्तीची आहे. 

मोगल व मराठ्यांच्या दरबारातही पत्रव्यवहार सांभाळणाऱ्या व्यक्तीस फडणवीस किंवा चिटणीस (सचिव) असे म्हणत असत. वरिष्ठ अधिकाऱ्याने संस्थेतील अगर व्यवसायातील कारकुनी व गोपनीय स्वरूपाची कामे ज्या व्यक्तीवर सोपविलेली असतात व ज्या व्यक्तीवर वरिष्ठांचा पूर्ण विश्वास असतो; अशा व्यक्तीला ' सचिव ' असे म्हणता येईल.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 16:37 ( 1 year ago) 5 Answer 6704 +22