संघटन कौशल्य म्हणजे काय?www.marathihelp.com

संघटन कौशल्य म्हणजे काय?

संघटन चालविण्यासाठी संघटन कौशल्य, संघटनेचा उद्देश, ध्येय, आचारसंहिता, वैचारिक अधिष्ठान, कार्यकर्त्याचे मार्गदर्शन, निधीची तरतुद, लढ्याचे स्वरुप, संघटनेची कार्यपध्दती इ. या बाबी लक्षात घेऊन जे संघटन ऊभे राहते. ते संघटन यशस्वी होते. संघटन चालविण्यासाठी कार्यकर्ता लागतो.

संघटन हे सामाजिक असते. त्यामुळे सर्वांच्या विचाराला प्राधान्य दिले जावे. परंतु एकवाक्यता महत्वाची होय. संघटनेत विविध स्वरुपाची कामे असतात. कार्यकर्त्याने इतरांचा द्वेश व मत्सर न करता प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करावे. बौध्दिक व शारीरिक स्वरुपाची कामे सारख्याच पातळीवरची असतात.

संघटनेला बुध्दिजिवी वर्गाने वेळ, पैसा व बुध्दी दिली पाहिजे. तरुणांनी वेळ व बळ दिले पाहिजे. एक मिशन स्वरुपात कार्यकर्ते काम करत असतील तर ती संघटना कायम टिकते. संघटनेचा पैसा हा सार्वजनिक असतो. त्याचा हिशोब काटेकोरपणे ठेवला पाहिजे. संघटनेचे पद ही मिरवायची बाब नसून दिलेली जबाबदारी पार पाडण्यास मिळालेली संधी असते. पदासाठी न भांडता संघटनेच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी काम केले तर यश मिळते. संघटनेतील कार्यकर्त्यांना प्रशिक्षणाची गरज असते. ती वेळोवेळी पूर्ण केली पाहिजे. संघटनेतील कार्यकर्त्यांनी चळवळीचा अभ्यास केला पाहिजे. सर्वांच्यात परस्पर दृढ विश्वास असल्याशिवाय संघटन टिकू शकत नाही. या सर्वबाबींची पूर्तता जी संघटना काटेकोरपणे करेल ती नक्कीच यशस्वी होईल.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 15:39 ( 1 year ago) 5 Answer 5896 +22