हवाई सेना म्हणजे काय?www.marathihelp.com

भारतीय वायुसेना ही भारतीय संरक्षण दलांच्या पाच मुख्य विभागांपैकी एक असून तिच्यावर भारताच्या वायुक्षेत्राचे रक्षण करण्याची व भारतासाठी हवाई युद्ध करण्याची जबाबदारी आहे. भारतीय हवाई दल जगातल्या पहिल्या पाच उत्कृष्ट दलातील एक मानले जाते.

भारतीय वायुसेनेचे ध्येयवाक्य आहे :
नभ:स्पृशं दीप्तम्।

इतिहास
८ ऑक्टोबर, इ.स. १९३२ मध्ये भारतीय वायुसेनेची स्थापना झाली. सुब्रोतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे वायुदलातले प्रमुख होते. १२ मार्च इ.स. १९४५ रोजी वायुदलाचे नाव रॉयल इंडियन एयर फोर्स झाले.


विमाने

इ.स. १९४७ मध्ये विमानांना पिस्टन वर चालणारी इंजिने बसवलेली असत. जेट इंजिनांच्या आगमनानंतर त्याची जागा नंतर वेगवान जेट विमानांनी घेतली. प्रथम नॅट, हंटर, कॅनबेरा यासारखी ब्रिटिश बनावटीची विमाने वायुसेनेत सहभागी केली गेली. त्या नंतर तंत्रज्ञानाच्या कसोटीवर नंतर त्यांची जागा फ्रेंच बनावटीच्या विमानाने घेतली. भारतीय परराष्ट्र धोरणामुळे आणि रशियाने उत्तम सहकार्य केल्याने दणकट बनावटीची रशियन लढाऊ आणि मालवाहू विमाने सहभागी करण्यात आली. तसेच रशियन हेलिकॉफ्टर्स सहभागी करण्यात आली.

सद्याच्या काळात आधुनिक रडार यंत्रणा, क्षेपणास्त्रे, दळणवळण यंत्रणा, नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर सी-४ आय ही संगणकीय प्रणाली वायुसेनेकडे आहे. हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणारी विमाने, विमानातून रडार वापरून दूर अंतरावरील शत्रूच्या विमानांची टेहळणी करणारी यंत्रणा, कक्षेबाहेरील शत्रूच्या ठिकाणाचा वेध घेणारी इत्यादी अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्रे सेनेत सहभागी करण्यात आली आहेत.

तसेच अत्याधुनिक लढाऊ विमानांची भर पडल्यामुळे भारतीय वायुसेना जगातील सर्वोच्च वायुदल आहे.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 15:28 ( 1 year ago) 5 Answer 6507 +22