मित्रांनो शिक्षणाचा अधिकार अंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या वंचित गटातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाच्या सुविधा पुरविल्या जातात. मराठी तसेच इंग्लिश मीडियम शाळांमध्ये RTE अंतर्गत 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येत असतात. आर्थिक दृष्ट्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात येत असते. Right to Education अंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे आर्थिक वंचित गटासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या 25 टक्के जागा अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यात येत असतो. या अंतर्गत आपण आपल्या मुलांची शिक्षण मोठ्या इंग्लिश मीडियम शाळांमध्ये शासनाच्या कोट्यातून करू शकतो. शिक्षणाच्या अधिकारांतर्गत अर्ज कसा करायचा? RTE Admission 2022-23 Maharashtra करिता आवश्यक कागदपत्रे याविषयी विस्तृत माहिती आपण आता जाणून घेणार आहोत.
RTE free admission अंतर्गत आर्थिक दृष्ट्या वंचित घटकांना इंग्लिश मीडियम तसेच मराठी मिडीयम शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळवून देण्यात येत आहे. याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून तो कसा करायचा त्याची संपूर्ण प्रक्रिया आता आपण जाणून घेऊया.
सन 2023 व 2024 करिता rte प्रवेशाचे अर्ज हे वर्ष 2023 मधील फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणार असून याकरिता कोणकोणती कागदपत्रे लागणार ते आपण आत्ताच जाणून घेऊन तयार करून ठेवले पाहिजे. तसेच अधिकृतपणे तारीख जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावे लागतील. त्याचबरोबर आपला मुलगा किंवा मुलगी शिक्षणाच्या अधिकारांतर्गत एडमिशन करण्याकरिता पात्र आहे किंवा नाही ते सुद्धा आपण जाणून घेतले पाहिजे.
RTE अंतर्गत 2023 करिता कोण अर्ज करू शकतात?
मित्रांनो RTE free admission अंतर्गत वर्ष 2023 करिता आर्थिक वंचित गटातील मुले मुली अर्ज करू शकतात ज्यांचे वय हे 4.5 पासून वय वर्ष 7.5 पर्यंत आहे.
RTE प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे :-
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने इंग्लिश मीडियम शाळांमध्ये मोफत ऍडमिशन(RTE Admission 2022-23) मिळवण्याकरिता म्हणजेच RTE Admission 2022-23 Maharashtra करिता आपल्याला खालील कागदपत्रे सादर करावी लागतात.
1. आधार कार्ड
2. रेशन कार्ड
3. विजेचे बिल किंवा पाणी बिल
4. कर पावती
5. बँक पासबुक
6. कास्ट सर्टिफिकेट
7. पालकाचा उत्पन्नाचा दाखला
8. विद्यार्थ्याचे जन्म प्रमाणपत्र
9. विद्यार्थी अपंग असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र
वरील कागदपत्रे आपण rte admission अंतर्गत आत्तापासूनच जमा करून ठेवायला पाहिजे.
RTE Admission कशी करायची? RTE Maharashtra Admission Process
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या RTE Admission अंतर्गत खालील प्रमाणे ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
1. विद्यार्थ्यांना सर्वप्रथम खाली दिलेल्या पोर्टलवर जायचे आहे त्या ठिकाणी नोंदणी करायची आहे.
2. Rte admission portel वर जाण्याची लिंक- https://student.maharashtra.gov.in
3. या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा विद्यार्थ्यांच्या नावाची नोंदणी करून घ्यावी
4. आता तुम्हाला एक पासवर्ड मिळालेला आहे तो पासवर्ड बदला आणि लॉगिन करून घ्या.
5. आता विद्यार्थ्यांची वैयक्तिक सर्व माहिती भरा.
6. विचारलेली सर्व माहिती व्यवस्थितपणे भरा अर्ज भरताना जवळच्या शाळेची निवड करा ज्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन करायची आहे.
7. आता अर्ज ऑनलाईन सबमिट करा.
RTE अंतर्गत शाळेची निवड कशी करायची? Rte School List Maharashtra
RTE अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कोट्यातून शाळांमध्ये प्रवेश मिळवण्याकरिता तुम्हाला वरील प्रमाणे ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यापूर्वी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुमच्या जवळच्या शाळेची माहिती तपासून घ्यावी त्यानंतर ऑनलाईन अर्ज करावा.
Rte admission अंतर्गत जवळची शाळा शोधण्याची लिंक
RTE free admission अंतर्गत वर्ष 2023 करिता अजून अर्ज सुरू झालेले नसून अर्ज सुरू झाल्यानंतर या वेबसाईटवर एका नवीन पोस्ट च्या माध्यमातून तुम्हाला कळविण्यात येईल. आता तुम्हाला RTE free admission बद्दलची संपूर्ण माहिती कळलेली असेल. ही माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांच्या पाल्यांना मोफत इंग्लिश मीडियम शाळांमध्ये शिकवता येईल. ही माहिती सर्व मित्रांना नक्की शेअर करा.