संजय गांधी निराधार योजना नवीन अर्ज सुरू; 1200 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार | Sanjay Gandhi Niradhar Yojana

मित्रांनो संजय गांधी निराधार योजना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत राज्यातील निराधार व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्याकरिता आर्थिक मदत म्हणून मासिक 1200 रुपये देण्यात येत असते. संजय गांधी निराधार योजने(Sanjay Gandhi Niradhar Yojana) अंतर्गत नवीन अर्ज सुरू झालेले असून या योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा तसेच पात्रता व आवश्यक कागदपत्रे याविषयी विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra ही आपल्या राज्यातील निराधार व्यक्तींना सन्मानाने जगता यावे याकरिता दर महिन्याला ठराविक पेन्शन मिळवून देणारी महत्त्वपूर्ण अशी सरकारी योजना आहे. केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणारी ही योजना आपल्या महाराष्ट्रात सुद्धा लागू आहे. या योजनेअंतर्गत कर्ता व्यक्ती नसलेल्या तसेच निराधार असलेल्या व्यक्तींना आर्थिक सहाय्य पुरवण्यात येत असते.

 

संजय गांधी निराधार योजना पात्रता Sanjay Gandhi Niradhar Yojana Eligibility

संजय गांधी निराधार योजने(Sanjay Gandhi Niradhar Yojana) अंतर्गत लाभ कोणत्या व्यक्तीला द्यावा याकरिता काही पात्रता ठरवून देण्यात आलेले आहे. संजय गांधी निराधार योजना अंतर्गत जर आपण खालील बाबींची पूर्तता करणार असाल तरच या योजनेअंतर्गत आपल्याला लाभ मिळवता येतो.

1. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा लागतो.

2. अर्जदारांनी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी म्हणून किमान पंधरा वर्षे वास्तव्य केलेले असावे.

3. अर्जदार हा निराधार असावा लागतो

4. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत बीपीएल रेशन धारकांना तसेच कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींना लाभ देण्यात येतो

5. अर्जदार दारिद्र रेषेखालील असावा लागतो

6. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे सर्व मार्गांनी मिळून कमीत कमी असावे लागते

 

संजय गांधी निराधार योजना अंतर्गत किती लाभ मिळणार?

मित्रांनो संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojana) ही महत्वपूर्ण अशी निराधार यांना पेन्शन देणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेल्या व्यक्तींना दरमहा ठराविक पेन्शन वितरित करण्यात येत आहे. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जर एका कुटुंबामध्ये एक व्यक्ती निराधार असेल तर त्याला हजार रुपये देण्यात येतात. जर कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर त्यांना बाराशे रुपये महिन्याला देतात.

संजय गांधी निराधार योजने(Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra)अंतर्गत निराधार पेन्शन ही लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक अकाउंट मध्ये जमा करण्यात येत असते. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत नवीन अर्ज करून घेणाऱ्या व्यक्तीने त्यांचे बँक अकाउंट त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक करणे आवश्यक असेल.

 

संजय गांधी निराधार योजना कोण लाभ मिळवू शकतो?

संजय गांधी निराधार योजना(sanjay gandhi niradhar yojna) अंतर्गत निराधार असणाऱ्या व्यक्तींना लाभ मिळवता येत असतो. त्यामध्ये विधवा महिला तसेच कर्ता नसलेले कुटुंब तसेच अनाथ मुले अठरा वर्षाखालील व गंभीर आजार असणारे व्यक्ती जसे की कर्करोग व कुष्ठरोग तसेच इतर पात्र व्यक्ती या योजनेअंतर्गत लाभ मिळवू शकतात.

संजय गांधी निराधार योजना अर्ज करा

संजय गांधी निराधार योजना आवश्यक कागदपत्रे Sanjay Gandhi Niradhar Yojana Necessary Documents

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता निराधार कुटुंबांना खालील कागदपत्रे सादर करावी लागतात. या योजनेअंतर्गत सादर करण्यात येणाऱ्या कागदपत्रांची तहसील कार्यालयामध्ये तपासणी करण्यात येते त्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यात येत असतो त्यामुळे खाली कागदपत्रे सादर करावी लागतात.

1. अर्जदाराची आधार कार्ड

2. अर्जदाराची वोटर कार्ड

3. बँक पासबुक आधार कार्ड सोबत लिंक असले पाहिजे

4. उत्पन्नाचा दाखला

5. शाळा सोडल्याचा दाखला

6. पासपोर्ट साईज चे फोटो

7. निराधार योजनेचा फॉर्म

वरील सर्व कागदपत्रे जोडून आपल्याला संजय गांधी निराधार योजना अंतर्गत अर्ज करावा लागतो.

 

संजय गांधी निराधार योजना अर्ज कसा करायचा?How to apply for Sanjay Gandhi Niradhar Yojana?

मित्रांनो संजय गांधी निराधार योजना(Niradhar Yojana Maharashtr) अंतर्गत नवीन अर्ज सुरू झालेल्या असून ज्या व्यक्तींना नवीन अर्ज करायचा आहे त्यांनी तुम्ही ज्या तालुक्यांमध्ये राहतात त्या तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये जायचे आहे त्या ठिकाणी तुम्हाला निराधार योजनेअंतर्गत अर्ज उपलब्ध करून देण्यात येतो. संजय गांधी निराधार योजनेचा ऑफलाईन अर्ज घेऊन त्यावर व्यवस्थित माहिती भरून वर दिलेली सर्व कागदपत्रे जोडून तो अर्ज तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जमा करायचा आहे.

हे नक्की वाचा : मोफत पीठ गिरणी योजना अंतर्गत अर्ज सुरू 

संजय गांधी निराधार योजने संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास तुम्ही तुमची तलाठी कार्यालय तसेच तहसील कार्यालय व सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी संपर्क साधू शकतात.