सातबारा उताऱ्यात झाले 11 महत्वपूर्ण बदल; जाणून घ्या नवीन सातबारा कसा आहे, कोणते बदल झालेत | Satbara Utara Changes

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या भूमी व अभिलेख विभागाच्या मार्फत राज्यातील सातबारा उतारा मध्ये 11 महत्त्वपूर्ण असे बदल करण्यात आलेले आहे. त्यामुळे सातबारा उताऱ्यावर झालेले हे नवीन बदल कसे आहेत, या नवीन बदलामुळे सातबारा उताऱ्यावर कोणत्या बाबींमध्ये बदल घडून येणार आहे. तसेच कोणत्या नवीन गोष्टींचा समावेश सातबारावर करण्यात आलेला आहे, या Satbara Utara Changes Online संदर्भात विस्तृत माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो जमिनीचा मालकी हक्क दर्शवणारा महत्त्वाचा कागद म्हणजे सातबारा उतारा असतो. सातबारा उतारा हा एक प्रकारे आपल्या जमिनीचा आरसा असतो. सातबारा उताराच्या माध्यमातून ती जमीन कोणाच्या नावावर आहे याची संपूर्ण माहिती मिळते. त्यामुळे प्रत्येक जमीन असणाऱ्या शेत मालकाकडे सातबारा असतोच. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने नुकतेच सातबारा उताऱ्यावर कोणत्या प्रकारची महत्त्वाची बदल केलेले आहेत, हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असले पाहिजे.

 

मित्रांनो सातबारा वरील गाव नमुना सातच्या माध्यमातून जमिनीशी संबंधित माहिती मिळते, जसे की कोणत्या व्यक्तीच्या नावावर किती जमीन आहे. ती जमीन हेक्टर मध्ये व एकर मध्ये किती आहे, याचा संपूर्ण तपशील गाव नमुना सात मध्ये असतो. तर गाव नमुना 12 मध्ये त्या जमिनीवर कोणत्या प्रकारची पिके घेतलेली आहेत, किती पिके घेतलेली आहेत, याचा संपूर्ण तपशील असतो.

 

मित्रांनो दिवसेंदिवस शासनाच्या माध्यमातून भूमी व अभिलेख विभागाच्या मार्फत सातबारा उतारा वर अनेक प्रकारचे बदल करण्यात येत असतात. तसेच केंद्र शासन सुद्धा ulpin च्या माध्यमातून जमिनीशी संबंधित सर्व माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध होण्यासाठी अनेक बदल करत आहे.

 

सातबारा उतारा वर खालील बदल झालेत

महाराष्ट्र शासनाच्या भूमी व अभिलेख विभागाच्या मार्फत 7/12 उतारा मध्ये खालील महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत.

1. गाव नमुना 7 मध्ये आता गावाचा विशिष्ट क्रमांकाचा कोड दर्शविण्यात येणार आहे.

2. जमिनीवरील बिगर शेती योग्य जमीन तसेच लावगड योग्य जमीन व एकूण क्षेत्रफळ हे स्वतंत्रपणे दर्शविण्यात येत आहे.

3. कृषी आणि बिगर कृषी क्षेत्रासाठी सातबारा उताऱ्यावर हेक्टर आर स्क्वेअर मीटर ही युनिट्स वापरण्यात येणार आहे.

4. नवीन Satbara वर आता खाते क्रमांक हा खातेदाराच्या नावापुढे दर्शविण्यात येणार आहे. यापूर्वी बदल होण्यापूर्वी तो इतर परवानगी या ऑप्शनमध्ये दाखवण्यात येत होता. आता तो बदलण्यात आलेला आहे.

5. शब्द शेतकऱ्यांच्या सातबारावर दाखवण्यात येणारे कर्जाचे नोंदी तसेच मृत खातेधारकांच्या नोंदी व इलेक्ट्रॉनिक करार हे यापूर्वी कंसाद्वारे कंसाच्या मधात दाखवण्यात येत होत्या, परंतु आता यामध्ये बदल करून त्यावर एक क्षैतिज रेषा काढण्यात येणार आहे.

6. इतर अधिकार स्तंभामध्ये सातबारा उताऱ्यावर प्रलंबित बदल म्हणून ते वैयक्तिकरित्या सूचीबद्ध करण्यात येणार आहे.

7. प्रत्येक सात बारा उताऱ्याला एक विशिष्ट प्रकारचा ओळख क्रमांक देण्यात येणार आहे.

8. गाव नमुना 7 मध्ये यापूर्वी घेण्यात आलेले जुने फेरफार दर्शविण्यासाठी आता जुना फेरफार क्रमांक नावाचा एक वेगळा स्तंभ तयार करून त्यामध्ये जुन्या फेरफार क्रमांकाची संपूर्ण यादी दाखवण्यात येणार आहे.

9. अंतिम फेरफार क्रमांक तसेच शेवटच्या नोंदी, जमिनीशी संबंधित शेवटचा व्यवहार हा दर्शविण्यासाठी अंतिम फेरफार क्रमांक व तारीख असा एक नवीन पर्याय सातबारा उतारा मध्ये दर्शविण्यात येणार आहे.

10. आर चौरस मीटर या प्रमाणामध्ये बिनशेती सातबारा उतारा ची शेतजमीन मोजण्यात येणार आहे.

11. सातबारा उताऱ्यावर दोन खातेधारकांची नावे असतील तर ते स्पष्टपणे दिसण्यासाठी ठळक ओळीने विभक्त करून त्याची खात्री करण्यात येणार आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई 13 हजार रुपये आताच पहा: जिल्हा निहाय यादी जाहीर

 

अशा प्रकारचे अनेक Changes in Satbara उतारा मध्ये करण्यात आलेल्या असून या बदला मागचा शासनाचा उद्देश हा कोणत्याही व्यक्तीला सहज आणि सोप्या पद्धतीने सातबारा उताऱ्याचे वाचन करता यावी असा आहे. तसेच राज्यातील सर्व जनतेला सातबारा सहज उपलब्ध व्हावा यासाठी सुद्धा प्रयत्न होत आहे. सातबाराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तसेच कामकाजाची अचूकता सुधारण्यासाठी हे बदल महत्वाचे आहे.

एसबीआय बँकेच्या मार्फत दरमहा 90 हजार रुपये कमावण्याची सुवर्णसंधी! जाणून घ्या काय आहे योजना; अर्ज प्रक्रिया

अशा प्रकारची अनेक बदल सातबारा उताऱ्यावर झालेल्या असून आता सर्वांना सातबारा उतारा समजण्यास सोपा जाणार आहे. तसेच प्रत्येक भागासाठी तसेच प्रत्येक वेगवेगळ्या बाबींसाठी वेगवेगळे कॉलम तयार करण्यात येत असल्यामुळे सर्व बाबी स्पष्टपणे ओळखू येणार आहे.