शासनांतर्गत शेतकऱ्यांकरिता आणि प्रकारचे निर्णय घेण्यात येत असतात त्यातील एक निर्णय म्हणजे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य शासना अंतर्गत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, तो शेतकऱ्यांकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शेतकऱ्यांना विजेचा पुरवठा अखंडित असावा याकरिता हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
सौर ऊर्जा प्रकल्पाकरिता हेक्टरी 1 लाख 25 हजार
त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या जमिनी प्रति हेक्टर 75 हजार रुपये या एवढ्या भाड्याने घेतल्या जात होत्या म्हणजे प्रति एकर तीस हजार रुपये याप्रमाणे घेतल्या जात होत्या. परंतु शेतकऱ्याकडून वाढत्या मागणीनुसार शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या प्रति एकर 50 हजार रुपये भाड्याने घेतला जाणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर वार्षिक 1 लाख 25 हजार एवढे भाडे देण्यात येणार आहे.
सौर कृषी पंप वाहिनी टप्पा – 2
महाराष्ट्र मध्ये सर्व कृषी पंप वाहिनी टप्पा 2 राबविण्या करिता मंजुरी देण्यात आलेली आहे, त्यामुळे 2025 पर्यंत जे कृषी फिल्डर आहे त्या कृषी फिल्डरचे सोलरायझेशन केले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा सुद्धा उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे शासनांतर्गत सौर कृषी पंप वाहिनी टप्पा दोन राबविण्यात येत आहे.
एवढ्या कोटीचा निधी मंजूर
सौर कृषी पंप वाहिनी टप्पा दोन करिता निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्न सुटतील त्यामुळे एकूण 700 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळेल शेतकऱ्यांना दिवसा विज उपलब्ध होण्यास मदत होईल, या करिता शासना अंतर्गत मंजूर देण्यात आलेली आहे