एसबीआय बँकेच्या मार्फत दरमहा 90 हजार रुपये कमावण्याची सुवर्णसंधी! जाणून घ्या काय आहे योजना; अर्ज प्रक्रिया | SBI ATM Franchise

एसबीआय बँकेच्या मार्फत स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फ्रेंचाईजी मिळवून दरमहा 90 हजार रुपये कमावण्याची सुवर्णसंधी स्टेट बँक ऑफ इंडिया ने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. SBI ATM Franchise करिता अर्ज कसा करायचा, त्याकरिता आवश्यक कागदपत्रे व अटी आणि शर्ती या संदर्भात संपूर्ण माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

 

एसबीआय बँकेने त्यांची एटीएम फ्रेंचायसी मिळवून दरमहा 90 हजार रुपये कमावून देण्याची चांगली संधी आणलेली आहे. याकरिता तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया एटीएम फ्रेंचाईजी मिळवावी लागेल. एसबीआय ने घरी बसून कमवण्याची एक चांगली संधी आणलेली असून जर तुम्ही घरच्या घरी एक चांगला बिजनेस चालू करण्याचा विचारत असाल तर तुमच्यासाठी SBI ATM Franchise Online मिळविण्याची ही माहिती महत्त्वाची आहे.

 

स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारत देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. स्टेट बँक त्यांच्या ग्राहकांसाठी वेळोवेळी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देते. स्टेट बँकेच्या ग्राहकांना एटीएम च्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी बँक एटीएमची फ्रेंचायसी देऊन एटीएम सुविधा सुरू करत असते. त्यामुळे तुमच्या आमच्यासारखे काही व्यवसायिक एसबीआय सारखी एटीएम फ्रेंचायसी मिळवतात आणि त्यांना दरमहा पैसे कमावण्याची संधी प्राप्त होते.

 

एसबीआय बँक एटीएम फ्रेंचाईजी सुविधा

एसबीआय बँक कोणत्याही प्रकारची एटीएम स्वतः बसवत नाही तर कोणत्याही थर्ड पार्टी सोबत करार करून फ्रेंचाईची पद्धतीने एटीएम बसवत असते. एसबीआय बँकेचे एटीएम वेगळ्या स्वतंत्र कंपनीद्वारे बसवण्यात येतात. देशात काही विशिष्ट कंपन्या आहेत ज्या इतर बँकांना एटीएम सुविधा उपलब्ध करून देतात. त्या कंपन्या विशिष्ट बँकांची एटीएम स्थापित करण्यासाठी फ्रेंचाईची पद्धतीने एटीएम बसून बँकांना सुविधा पुरवठा तसेच sbi atm frenchise धारकाला सुद्धा पैसे कमवण्याची संधी उपलब्ध करून देतात.

 

एसबीआय बँकेची एटीएम फ्रेंचायसी मिळवण्यासाठी अटी व शर्ती

मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया ने कोणत्याही ग्राहकाला किंवा व्यक्तीला फ्रेंचायजी देण्यासाठी काही अटी व शर्ती ठरवून देण्यात आलेले आहे. त्याखालील प्रमाणे आहे.

1. Sbi atm frenchise मिळवू इच्छिणाऱ्या अर्जदाराकडे किमान 50 ते 80 स्क्वेअर फुट जागा असावी लागते.

2. ही जागा जवळपासच्या एटीएम पासून 100 मीटर अंतरावर असावी लागते.

3. एटीएम बसवण्याची दृश्यमान असावी तसेच चांगल्या जागेवर असावी.

4. ज्या ठिकाणी एटीएम बसवणार आहात ती जागा जमिनीच्या पातळीवर असावी.

5. एटीएम करिता चोवीस तास वीज पुरवठा असावा तसेच एक किलो वॅट वीज जोडणीची सुविधा तुम्हाला उपलब्ध करून द्यावी लागते.

6. त्या जागेवर दररोज किमान 300 व्यवहार व्हायला पाहिजे.

7. सोसायटी किंवा प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवावे लागते.

 

एसबीआय एटीएम फ्रेंचायसी मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे Required Documents for SBI ATM Franchise

मित्रांनो जर तुम्ही सुद्धा स्टेट बँक ऑफ इंडिया एटीएम फ्रेंचायजी मिळवून इच्छिणाऱ्या साल तर तुमच्याकडे खालील कागदपत्रे असायला पाहिजे.

1. आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान कार्ड

2. अर्जदाराची रेशन कार्ड

3. अर्जदाराची बँक खाते पासबुक

4. जीएसटी नंबर

5. पासपोर्ट साईज चे फोटो मोबाईल नंबर व ईमेल आयडी

6. इतर आर्थिक दस्तऐवज

 

एसबीआय एटीएम फ्रँचायझी करिता अर्ज कसा करायचा? How To Apply For SBI ATM Franchise?

मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया स्वतः कोणत्याही ग्राहकाला किंवा व्यक्तीला फ्रेंचाईजी सुविधा देत नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया ने इतर काही कंपन्यांसोबत करार केलेला असतो. व त्या कंपन्या फ्रेंचाईजी सुविधा पुरवून त्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम बसवत असतात.

तुम्ही खालील कंपन्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून एटीएम फ्रेंचाईजी मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात.

 

Sbi Atm frenchise मिळविण्यासाठी येथे अर्ज करा 

एटीएम फ्रँचायझी मधून उत्पन्न किती मिळेल?

Sbi atm frenchise मिळविल्यानंतर तुम्हाला मिळणारे उत्पन्न हे तुमच्या atm वरील transaction वर अवलंबून असते. एटीएम फ्रँचायझी पुरविणाऱ्या कंपन्या फ्रँचायझी धारकांना एटीएम वरील व्यवहार प्रमाणे कमिशन देतात. नॉन कॅश ट्रांजेक्शन आणि कॅश ट्रांजेक्शन साठी वेगवेगळ्या प्रकारचे कमिशन पुरविण्यात येते. जर तुमच्या एटीएम वरून चांगले व्यवहार होत असतील तर तुम्ही 90000 रुपयापर्यंत देखील कमिशन मिळवू शकतात.

Sbi Atm frenchise कोण मिळवू शकतो, ते येथे पहा 

वरील कंपन्यांमार्फत तुम्ही एटीएम मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर सर्व बाबींची तपासणी करण्यात येते तसेच सर्व निकष पूर्ण होत असल्यास तुम्हाला फ्रेंचायजी मिळेल.

Leave a Comment