मित्रांनो केंद्र शासनाच्या वतीने आपल्या महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय पशुधन अभियान हे राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने राज्यात शेळ्या व बोकड पालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढावी व हे शेतकरी आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावी या उद्देशाने आपल्या महाराष्ट्रात शेळी आणि बोकड पालन करिता 50 लाख रुपये पर्यंतची अनुदान देण्यात येत आहे. तर या Sheli Bokad Palan Anudan Yojana संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. Goat Farming Subsidy Scheme Maharashtra
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने पाचशे शेळ्यांची तसेच पंचवीस बोकडांचे पालन करण्याकरिता पन्नास लाख रुपयांपर्यंतचे अनुदान हे वितरित करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या वतीने हा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याला मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे. या निर्णयानुसार आता महाराष्ट्र सरकार शेळी पालन करणाऱ्या पशुपालकांना अनुदान वितरित करण्यात येत आहे. Goat Farming Subsidy Scheme 2022-23 Maharashtra
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेळी व मेंढी पालन sheli palan yojana 2022 marathi करणाऱ्या पशुपालकांना 50 लाख रुपयांपर्यंतची अनुदान तसेच जे पशुपालक कुक्कुटपालन करतील अशांना 25 लाख रुपये पर्यंतचे अनुदान हे वितरित करण्यात येणार आहे. राज्यात पशुपालन करणाऱ्या लाभार्थ्यांना महत्त्वपूर्ण असा या योजनेअंतर्गत दिलासा मिळणार आहे. राज्यात अनेक असे तरुण आहेत जे पशुपालन करू शकतात परंतु पुरेसे भांडवल नसल्यामुळे तसेच पैशाची उपलब्धता नसल्यामुळे त्यांना पशुपालन करणे शक्य होत नाही.
त्यामुळे आता या योजनेअंतर्गत वैयक्तिकरित्या अर्ज करून राज्यातील कोणालाही पन्नास लाख रुपये पर्यंतचे अनुदान मिळवता येणार आहे. या योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेली असून अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे या संदर्भात सुद्धा माहिती खाली दिलेली आहे.
शेळी पालन ऑनलाईन अर्ज Sheli Palan Yojana Maharashtra
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या या शेळी व बोकड पालन अनुदान योजना(sheli palan yojana maharashtra) अंतर्गत लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या योजनेअंतर्गत करावयाचा अर्ज हा तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करायचा आहे. यांनी संदर्भात संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन चेक करू शकतात.
योजने अंतर्गत अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे
मित्रांनो या शेळी व बोकड पालन योजना(sheli bokad palan anudan yojana maharashtra) अंतर्गत अर्ज करण्याकरिता आपल्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.
1. अर्जदाराचे आधार कार्ड
2. अर्जदाराचा पॅन कार्ड
3. पासपोर्ट आकाराचे फोटो
4. रहिवासी दाखला
5. शेळी व बोकड पालन प्रकल्पाचा प्रस्ताव
6. जमिनीचे दस्तऐवज
7. जीएसटी नंबर
8. आयकर रिटर्न
इत्यादी कागदपत्रे आपल्याला या योजनेअंतर्गत आवश्यक आहेत.
शेळी व बोकड पालन अनुदान योजना अर्ज प्रक्रिया
मित्रांनो शेळी व बोकड पालन अनुदान योजना(sheli palan yojana maharashtra) अंतर्गत 50 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळवण्याकरिता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची वेबसाईट खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून पुढील प्रक्रिया करा.
मित्रांनो शेळी व बोकड पालन अनुदान योजना(sheli bokad palan anudan yojana) संदर्भातील ही माहिती तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण वाटत असेल. ही माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा या योजनेस संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास कमेंट करून प्रश्न विचारू शकतात. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची नक्कीच आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू.