शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या हितार्थ केंद्र सरकार तसेच राज्य सरकार वेळोवेळी विविध शेतकरी अनुदान योजना राबवत असते. काही योजना या केंद्र शासनाच्या अंतर्गत राबवण्यात येत असतात. तर काही योजना महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत राबविण्यात येत असतात. तर काही शेतकरी अनुदान योजना(Shetkari Anudan Yojana 2022-23 Maharashtra) ह्या केंद्र तसेच राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात येत असतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण अशाच केंद्र व राज्य शासनाच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांविषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. ज्या शेतकरी अनुदान योजना 2022-23(Shetkari Anudan Yojana 2022 Maharashtra) आपल्या महाराष्ट्र राज्यात सध्या सुरू आहेत. अश्या योजना विषयी माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
आपला महाराष्ट्र राज्यात अनेक शेतकरी योजना shetkari yojana राबवण्यात येत आहेत. त्यापैकी बऱ्याच योजना या महाडीबीटी शेतकरी पोर्टलच्या अंतर्गत राबविण्यात येत आहेत. बऱ्याच योजना पोखरा योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे. तर काही शेतकरी अनुदान योजना 2022(shetkari anudan yojana 2022) ह्या स्पेशल त्या पोर्टलवर राबविण्यात येत आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण शेतकरी अनुदान योजना 2022-23 संपूर्ण लिस्ट जाणून घेणार आहोत.
शेतकरी अनुदान योजना 2022-23 महाराष्ट्र लिस्ट Shetkari Anudan Yojana 2022-23 Maharashtra List
आपल्या महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध शेतकरी अनुदान योजना 2022-23 महाराष्ट्र लिस्ट खालील प्रमाणे आहे. Shetkari Yojana Maharashtra list. आता आपण shetkari yojana list जाणून घेणार आहोत.
1. महा डीबीटी शेतकरी योजना ( Maha Dbt Farmers Scheme )
आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच पोर्टलच्या माध्यमातून मिळावा याकरिता महाडीबीटी शेतकरी पोर्टल(maha dbt farmers portel) सुरू करण्यात आलेले आहे. या महाडीबीटी फार्मर्स पोर्टलवर शासनाच्या अनेक योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मोटार पंप, पाईप संच, बियाणे योजना, विविध अवजारे व यंत्र पुरवणाऱ्या योजना या महाडीबीटी शेतकरी पोर्टल अंतर्गत राबविण्यात येत असतात. महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येते. त्यानंतर त्या लाभार्थ्यांना महाडीबीटी शेतकरी(shetkari yojana maharashtra) पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करायची असतात. त्यानंतर पूर्व संमती मिळाल्यानंतर काम सुरू करायचे असते. त्यानंतर लाभार्थ्यांना योजनेची अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येते. ज्या अर्जदारांनी महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर अर्ज केला आहे परंतु त्यांची निवड झालेली नाही, अशा शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी केलेल्या अर्ज पुढील वर्षाकरिता सुद्धा लागू असतो. Shetkari Anudan Yojana Maharashtra
2. पोक्रा योजना (Pocra Yojana)
आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी अनुदान योजना महाराष्ट्र(shetkari anudan yojana maharashtra) अंतर्गत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारी पोखरा ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. राज्यातील हवामान बदलास अति संवेदनशील असलेल्या 5142 गावांमध्ये ही पोखरा योजना राबविण्यात येत आहे. मराठवाड्यातील आणि विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील गावांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. ज्या गावांमध्ये ही पोखरा योजना राबवण्यात येते, त्या गावातील शेतकऱ्यांनी पोखरा योजनेच्या पोर्टलवर जाऊन नोंदणी करायची असते. त्यानंतर शेतकरी बांधवांनी पोखरा योजनेअंतर्गत असलेल्या विविध योजनांकरिता अर्ज करायचा असतो. पोखरा योजनेअंतर्गत नवीन विहीर बांधकाम योजना, जुनी विहीर दुरुस्ती योजना, ठिबक सिंचन तसेच तुषार सिंचन योजना, मोटार पंप योजना, फळबाग लागवड योजना, नाडे कंपोस्टिंग, शेडनेट हाऊस अशा प्रकारच्या अनेक योजनांकरिता लाभ देण्यात येतो. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा योजना ही ज्या गावांमध्ये चालू आहे, त्या गावातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येतो. Shetkari Anudan Yojana Maharashtra
3. रोजगार हमी योजना Rojgar Hami Yojana
शेतकरी अनुदान योजना (Shetkari Anudan Yojana Maharashtra) महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामीण भागांमध्ये सर्व खेड्यांमध्ये रोजगार हमी योजना राबविण्यात येत असते. या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावातील नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत असतो. तसेच रोजगार प्राप्त करून देण्यात येत असतो. रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत विहीर योजना, नाडेप कंपोस्टिंग, शेड बांधकाम योजना अशा प्रकारच्या अनेक योजना राबविण्यात येत असतात. ग्रामीण भागामध्ये राबविण्यात येणारी रोजगार हमी योजना ही एक महत्त्वपूर्ण अशी शासनाची योजना आहे. Shetkari Anudan Yojana Maharashtra 2022
4. शरद पवार ग्राम समृद्धी योजना Sharad Pawar Gram Samriddhi Yojana
शेतकरी योजना महाराष्ट्र अंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. या शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या चार योजनांचा लाभ देण्यात येतो. यामध्ये शेळी पालन शेड बांधकाम योजना, कुक्कुट पालन शेड, गाय गोठा योजना भू संजीवनी नाटक कंपोस्टिंग अशा चार योजनांचा समावेश आहे. शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत अर्ज ऑफलाइन पद्धतीने तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मध्ये करायचा असतो. या योजनेअंतर्गत मनरेगाच्या निकषाप्रमाणे लाभ देण्यात येतो. गाय गोठा बांधकाम करिता 77 हजार रुपये अनुदान देण्यात येते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे जास्त जनावर असल्यास दुप्पट आणि तिप्पट लाभ देण्याची तरतूद आहे. Shetkri Yojana Maharashtra 2022-23,shetkari yojana maharashtra 2022
5. कृषी यांत्रिकीकरण योजना Krushi Yantrikikaan Yojana
आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शेतकरी अनुदान योजना अंतर्गत राबविण्यात येत आलेली ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. शेतकरी बांधवांना शेतीवर आधारित विविध यंत्रे अवजारे तसेच ट्रॅक्टरचलित अवजारे यंत्रे यांचे वाटप या कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत करण्यात येत आहे. कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर योजना तसेच ट्रॅक्टरला आवश्यक असणारे विविध साधने यांच्या योजना तसेच विविध अवजारे आणि उपकरणे यांच्या योजना पुरविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलच्या अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेला अर्ज करता येतो. कृषी यांत्रिकीकरण योजने मध्ये सुद्धा लाभार्थ्याची निवड ही लॉटरी पद्धतीनेच करण्यात येते. त्यानंतर यंत्र किंवा उपकरणे खरेदी केल्यानंतर त्या संबंधित बिले तसेच आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड केल्यानंतर लाभार्थ्याच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येते. Shetkari Anudan Yojana 2022-23 Maharashtra List, shetkari yojana maharashtra 2022
6. कृषी ड्रोन खरेदी अनुदान योजना Krushi Drone Kharedi Yojana
आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आधुनिक शेतीकडे वळावा. शेतकऱ्यांनी शेतीचे कामे आधुनिक पद्धतीने करावी याकरिता ड्रोन खरेदी अनुदान योजना राबवण्यात येत आहे. या कृषी ड्रोन खरेदी अनुदान योजना अंतर्गत लाभार्थ्यांना ड्रोन खरेदी करण्याकरिता 50 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येत आहे. शेतकरी बांधवांना कृषी ड्रोन खरेदी करण्याकरिता अनुदान देणारी योजना ही केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. शेतकरी बांधवांच्या शेती पद्धतीमध्ये सुधारणा आणणे तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे उद्दिष्ट केंद्र सरकार चे आहे. Shetkri Yojana Maharashtra 2022-23 List
7. प्रधानमंत्री पिक विमा योजना Pik Vima Yojana Maharashtra
मित्रांनो तुम्हाला सर्वांना प्रधानमंत्री पिक विमा योजना माहितीच असेल. तरीसुद्धा या योजने संदर्भात माहिती आपण जाणून घेऊया. प्रधानमंत्री पिक विमा योजना ही आपल्या महाराष्ट्र राज्य मध्ये राबविण्यात येत आहे. पिक विमा योजना ही केंद्र सरकार तसेच राज्य सरकार आणि शेतकरी यांच्या समन्वयाने राबविण्यात येत असते. शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या वाटेवर येणारी प्रीमियम रक्कम भरावी लागते. त्यानंतर राज्य सरकार राज्य सरकारच्या वाटेवरची विमा रक्कम कंपनीला देते आणि केंद्र सरकार त्यांच्या वाटेवर येणारी विमा रक्कम पिक विमा कंपनीला देते. त्यानंतर पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांची नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडे दावे दाखल करावे लागतात. पिक विमा क्लेम केल्यानंतर पिक विमा कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांच्या शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करतात. आणि त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा दिला जातो. अशाप्रकारे पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. या पिक विमा योजना अंतर्गत शेतकरी बांधवांना नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करावी लागते. किंवा कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा नोंदणी त्यांच्या बँकेकडून करून देण्यात येते. Shetkari Yojana List Maharashtra
8. बियाणे अनुदान योजना Biyane Anudan Yojana
शेतकरी बांधवांना बियाण्याचे वाटप करणारी किंवा बियाणे खरेदी करण्याकरिता अनुदान देणारी बियाणे अनुदान योजना ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. शेतकरी खरीप तसेच रब्बी बियाणे अनुदान तत्वावर उपलब्ध करून देण्यात येते. जसे की सोयाबीन, हरभरा, गहू अशा प्रकारच्या अनेक पिकांकरिता अनुदान देण्यात येते.
9. घरकुल योजना Gharkul Yojana
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल योजना राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही एक केंद्र पुरस्कृत घरकुल योजना असून या योजनेमध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि प्रधानमंत्री आवास योजना शहरी अशा दोन योजना राबविण्यात येत असतात. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांना स्वतःची हक्काचे व पक्के घर मिळावे या करिता अनुदान देण्यात येते. घरकुल योजना अंतर्गत घर बांधण्याकरिता नवीन नियमानुसार अडीच लाख रुपये देण्यात येतात.
10. जिल्हा परिषद योजना zp scheme maharashtra
जिल्हा परिषदेच्या अंतर्गत विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात. प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात. जसे की शिलाई मशीन योजना, शेळ्या व बोकड वाटप योजना, म्हशी वाटप योजना, पिठाची गिरणी वाटप योजना अशा प्रकारच्या अनेक योजना जिल्हा परिषद राबवित असते. यामध्ये महिलांकरिता सुद्धा अनेक योजना जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येत असतात.
11. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना निधी योजना
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र शासनाच्या वतीने शेतकरी बांधवांच्या सन्मानार्थ राबविण्यात येणारी महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. या पी एम किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दर चार महिन्याला दोन हजार रुपये मानधन असे मिळून वर्षाला तीन वेळा म्हणजेच एका वर्षात सहा हजार रुपये देण्यात येते. पी एम किसान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सहा हजार रुपये रकमेचा वापर शेतकरी बियाणे व औषधे खरेदी करण्याकरिता करू शकतात.
12. मुख्यमंत्री किसान योजना
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना च्या धरतीवर आपल्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा मुख्यमंत्री किसान योजना राबविण्यात येणार आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मानधन या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे. Shetkari Yojana
13. निराधार योजना
या निराधार योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील जे व्यक्ती निराधार आहेत जसे की, वृद्ध व्यक्ती. अंध व्यक्ती, अपंग व्यक्ती, शारीरिक व मानसिक आजाराने ग्रस्त असलेले व्यक्ती, विधवा अशा निराधार व्यक्तींना दर महिन्याला सहाशे रुपये देण्यात येत असतात. त्यामुळे या लोकांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मदत होते. या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या व्यक्तींचे उत्पन्न हे वार्षिक एकवीस हजार रुपये पेक्षा कमी पाहिजे. तसेच अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा लागतो.
अश्या प्रकारे आपल्या महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या शेतकरी अनुदान योजना ह्या राबविण्यात येत आहेत. आजच्या या पोस्टमध्ये आपण Shetkari Yojana Maharashtra List जाणून घेतली आहे. ही माहिती इतरांना देखील शेअर करा.