शुभमंगल विवाह योजना शेतकऱ्यांच्या मुलींना त्यांच्या विवाहाकरिता अर्थसहाय्य देणारी योजना | Shubhmangal Vivah Yojana Information Marathi

शेतकरी मित्रांनो शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या मुलीला लग्नासाठी अर्थसहाय्य देणारी महत्त्वपूर्ण अशी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांच्या मुलींना त्यांची लग्न करण्याकरिता अर्थसहाय्य पुरविण्यात येत आहे. या योजनेचे नाव Shubhmangal Vivah Yojana आहे. ही योजना काय आहे या योजनेची अंमलबजावणी कशाप्रकारे होत आहे, तसेच या योजनेअंतर्गत लाभ कसा मिळवायचा तसेच अर्थसहाय्य किती मिळते याविषयी विस्तृत माहिती आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो केंद्र तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितार्थ अनेक प्रकारचे योजना राबवित असते शेतकऱ्यांना आधुनिकीकरण करणे तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणे याकरिता अनेक प्रकारच्या योजना शासन राबवित आहे त्याच प्रकारे शेतकऱ्यांच्या मुलींसाठी ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मुलीचे लग्न करण्याकरिता अर्थसहाय्य देणारी महत्त्वपूर्ण अशी योजना शुभमंगल विवाह योजना(Shubhmangal Vivah Yojana Maharashtra) ही आपल्या महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे.

स्वतःच्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात करायचे असे प्रत्येक शेतकऱ्याचे स्वप्न असते. परंतु शेतकऱ्याची असलेली गरीब परिस्थिती लक्षात घेता तू तेवढे थाटामाटाने लग्न करू शकत नाही आणि केले तरीसुद्धा त्याला कर्जबाजारी व्हावे लागते त्याची परिस्थिती आर्थिक दृष्ट्या कमकुवत होते. त्यांनी मुलीच्या लग्नावर केलेला खर्च त्याला चार ते पाच वर्ष कर्जाच्या रूपात फेडावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्याचे समाजात नाव राहावे तसेच शेतकऱ्याने त्याच्या मुलीचा खर्च हा काही प्रमाणात शासनाकडून मिळावा याकरिता महत्त्वपूर्ण अशी Shubhmangal Vivah Yojana शासकीय योजना आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. शुभमंगल विवाह योजना ही एक शेतकरी आणि मजूर वर्गाकरिता राबवण्यात येणारी महत्त्वपूर्ण अशी सामूहिक विवाह योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या मुलीचे लग्न सामूहिक विवाह मध्ये करावे लागते.

 

शुभमंगल विवाह योजनेचे स्वरूप Shubhmangal Vivah Yojana Maharashtra

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शुभमंगल विवाह योजनेची (Shubhmangal Vivah Yojana) स्वरूपात आपण जाणून घेणार आहोत म्हणजेच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी त्याच्या मुलीचे लग्न केल्यास त्याला कोणते लाभ मिळतात हे जाणून घेऊया.

शुभमंगल विवाह योजनाही(Shubhmangal Vivah Yojana Maharashtra) सामूहिक विवाह योजना असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या मुलीला विवाह करिता मंगळसूत्र तसेच इतर वस्तूंची खरेदी करण्याकरिता दहा हजार रुपयाची अनुदान शासनाकडून देण्यात येते. त्याचप्रमाणे विवाह समारंभाचा खर्च आणि विवाह नोंदणी शुल्क खर्च हा शासनाच्या वतीने करण्यात येतो. अशाप्रकारे शुभमंगल विवाह योजना(Shubh Managal Vivah Scheme) अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या मुलीचे लग्न करण्याकरिता अर्थसहाय्य सरकार करत आहे.

 

शुभमंगल विवाह योजना लाभ कोणाला मिळू शकतो?

शुभमंगल विवाह योजना ही आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत वार्षिक एक लाख रुपये पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलींना लाभ मिळवून देण्यात येतो. शुभमंगल विवाह योजनाही शासनाच्या वतीने विकास संस्थेच्या द्वारे राबविण्यात येते या योजनेअंतर्गत सर्व खर्च शासन करत असून ही योजना राबविण्यात संस्थेस प्रति जोडप्या प्रमाणे दोन हजार रुपये अर्थसहाय्य पुरविण्यात येते. shubh mangal vivah yojana Maharashtra

मित्रांनो अशा योजना संदर्भात माहिती कुणालाही नसते त्यामुळे ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली असल्यामुळे तुम्ही ही सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. या योजनेसंदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास कमेंट करा आम्ही तुमच्या कमेंट चे नक्कीच उत्तर देऊ.