SIP म्हणजे काय आहे? SIP करण्याचे फायदे व तोटे | SIP Information In Marathi

SIP म्हणजे काय आहे? SIP करण्याचे फायदे व तोटे | SIP Information In Marathiमित्रांनो SIP हा एक गुंतवणुकीचा लोकप्रिय असा प्रकार आहे. आजकाल तुम्हाला अनेक ठिकाणी एसआयपी हा शब्द ऐकायला येत असेल. SIP म्हणजे काय आहे? एस आय पी गुंतवणुकीचे प्रकार किती आहेत? SIP करण्याचे फायदे व तोटे SIP Information In Marathi याविषयी विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. SIP Mahiti Marathi 

 

SIP म्हणजे काय आहे? What is SIP in Marathi

आता आपण एसआयपी म्हणजे काय ? sip information in marathi जाणून घेऊया. SIP चे पूर्ण नाव हे Systematic Investment Plan असे आहे. प्रत्येक घराघरांमध्ये एसआयपी करणारे लोक आहेत. दिवसेंदिवस गुंतवणुकीचा एसआयपी हा प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. एस आय पी करणे म्हणजे फक्त म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे असे नसून sip आपण स्टॉक्स मध्ये सुद्धा करू शकतो. तसेच इतरही अशा बरेच गोष्टी आहे ज्यामध्ये आपण एसआयपी पद्धतीने गुंतवणूक करू शकतो. त्याबद्दल आपण पुढे माहिती जाणून घेणार आहोतच. Sip in Marathi, sip information in Marathi

 

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास sip हे एक पैसे गुंतवणूक करण्याचे साधन आहे. ज्या व्यक्तींना शेअर मार्केट बद्दल जास्त ज्ञान नाही म्हणजेच त्यांना एखाद्या स्टॉक्स मध्ये कधी एन्ट्री घ्यायची आणि कधी एक्झिट व्हायचे हे माहीत नसते, अशा व्यक्तींनी एस आय पी करायची असते. एसआयपी केल्यामुळे आपली इन्व्हेस्टमेंट बॅलन्स होते त्यामुळे आपल्याला जास्त परतावा मिळण्याचे चान्स असतात. तसेच गुंतवणूक आली तर धोका सुद्धा आला.

 

Sip चे किती प्रकार आहेत? Types of SIP

एस आय पी चे खालील प्रकार पडतात. ते आता आपण जाणून घेऊया. Types of SIP in Marathi

1. Regular SIP

2. Flexible SIP

3. Top Sub SIP

4. Multi S.I. P

5. SIP and insurance

6. Trigger S.I.P.

7. Preparatory SIP

प्रामुख्याने वरील प्रकार हे एसआयपी गुंतवणुकीचे पडतात.

 

Sip गुंतवणुकीचे फायदे Benefits of Sip Investment

एस आय पी च्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचे खालील प्रमाणे फायदे आहेत.

1. एस आय पी च्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा मोठा फायदा म्हणजे जर आपल्याला एखादा 80 हजाराचा शेअर खरेदी करायचा असेल, परंतु तो शेअर खरेदी करण्यासाठी आपल्याकडे पैसे नसेल तर आपण त्या शेअरमध्ये फक्त 500 रुपये पासून गुंतवणूक करू शकतो. म्हणजेच त्या एका शेअरमधील काही हिस्सा एस आय पी च्या माध्यमातून खरेदी करू शकतो.

2. एस आय पी च्या माध्यमातून गुंतवणूक केल्यामुळे दर महिन्याला नियमित आणि शिस्तीने व ठराविक रकमेणे गुंतवणूक करता येते.

3. एस आय पी च्या माध्यमातून गुंतवणूक केल्यामुळे शेअर बाजारामध्ये होणाऱ्या चढउताराचा फायदा आपल्याला मिळतो.

4. एस आय पी हे दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्याकरिता आहे.

 

SIP गुंतवणुकीचे तोटे Disadvantages of SIP investment

ज्याप्रमाणे एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचे काही फायदे आहेत त्याचप्रमाणे एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचे काही तोटे सुद्धा आहेत. ते आता आपण जाणून घेऊया. Sip in Marathi

1. एस आय पी च्या माध्यमातून एखादा खराब फंड निवडल्यास आपल्याला येणारा परतावा हा कमी मिळू शकतो.

2. एस आय पी मध्ये गुंतवणूक करण्याकरिता तज्ञाचा सल्ला घ्यावा लागतो.

3. एस आय पी च्या माध्यमातून म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यास तो फंड आपण मॅनेज करत नाही तर फंड मॅनेजर ते मॅनेज करतात.

4. एस आय पी मध्ये जास्त रिटर्न देणाऱ्या स्कीम ह्या ज्याप्रमाणे जास्त रिटर्न देतात त्याचप्रमाणे जास्त लॉस सुद्धा करून देऊ शकतात.

 

SIP करताना गुंतवणुकीचा कालावधी कसा ठरवायचा?

एस आय पी करताना आपण दर महिन्याला गुंतवणूक करावी किंवा दर सहा महिन्याला करावी किंवा आठवड्यातून एकदा करावी किंवा दररोज एसआयपी करावी ह्या बाबी ठरवाव्या लागतात.

एस आय पी आपण खालील कालावधी निवडून करू शकतो.

1. Daily SIP

2. Weekly SIP

3. Monthly SIP

4. Quarterly SIP

5. Semi annual SIP

6. Annually SIP

वरीलपैकी कोणत्याही प्रकारात आपण एसआयपी करू शकतो. आपण आपल्याकडे असलेले पैसे पाहून योग्य ते कालावधी ठरवून SIP करू शकतो. sip (Systematic Investment Plan) in Marathi

हे नक्की वाचा:- इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे?

व्यावसायिक, दुकानदार तसेच दररोज उत्पन्न मिळवणारे व्यक्ती हे Daily SIP करू शकतात. Weekly SIP च्या माध्यमातून आपण दर आठवड्याला गुंतवणूक करू शकतो. Monthly SIP मध्ये पगारदार व्यक्ती तसेच नोकरदार व्यक्ती गुंतवणूक करू शकतात. म्हणजे जे महिन्याला इन्कम कमावतात अशी व्यक्ती. Semi annual SIP मध्ये आपण दर सहा महिन्याला गुंतवणूक करू शकतो. Annually SIP च्या माध्यमातून आपण दरवर्षी ठराविक रक्कम गुंतवू शकतो. शेतकरी लोक या एसआयपी मध्ये गुंतवणूक करू शकतात. sip (Systematic Investment Plan) in Marathi

 

एस आय पी मध्ये गुंतवणूक करण्याकरिता खालील बाबी विचारात घ्याव्या

कोणत्याही प्रकारच्या एसआयपी स्कीम मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्या स्कीमचा योग्य तो अभ्यास करावा. एस आय पी च्या माध्यमातून गुंतवणूक करताना आपण कोणत्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करत आहोत हे जाणून घ्यावे. एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यापूर्वी तो फंड यापूर्वी कशाप्रकारे रिटर्न देऊन गेलेला आहे? तसेच त्या फंड मॅनेजर कोण आहेत? याविषयी माहिती घेऊन नंतरच गुंतवणूक करावी. sip information in Marathi, sip mahiti marathi

हे नक्की वाचा:- QR Code म्हणजे काय? त्याचे फायदे काय

एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी भविष्यासाठी प्लॅनिंग करून घ्यावे. जसे की एखाद्या व्यक्तीला भविष्यामध्ये गाडी घ्यायची असेल किंवा एखादा बंगला बांधायचा असेल किंवा एखादी जमीन खरेदी करायची असेल इत्यादी. आता हे ध्येय लक्षात ठेवून तुम्हाला किती वर्षांमध्ये ते ध्येय पूर्ण करायचे आहे. त्याकरिता तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल तसेच तुम्हाला त्या गुंतवणुकी मधून किती परतावा मिळणार आहे. आणि त्याकरिता लागणारा कालावधी किती आहे ? तसेच दरवर्षी वाढणारी महागाई या सर्व गोष्टी एसआयपी करण्यापूर्वी विचारात घ्याव्या.

एस आय पी (sip) संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेतलेली आहे. ही माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा.