खते आणि औषधांकरिता शेतकरी बांधवांना 50 टक्के अनुदान ऑनलाईन अर्ज सुरू; लगेच अर्ज करा | Subsidy on fertilizer In Maharashtra

खते आणि औषधांकरिता शेतकरी बांधवांना 50 टक्के अनुदान ऑनलाईन अर्ज सुरू; लगेच अर्ज करा | Subsidy on fertilizer In Maharashtraशेतकरी मित्रांनो आपल्या भारत देशात जास्तीत जास्त लोकांचा व्यवसाय हा शेती आहे. आपल्या भारत देशातील 90% पेक्षा जास्त लोकसंख्या शेती या व्यवसायाशी निगडित असून शेती हे त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांची उत्पन्न दुप्पट व्हावे, तसेच शेतकऱ्यांना शेतातील पिके पिकवण्याकरिता येणारा खर्च कमी व्हावा याकरिता भारत सरकार विविध योजना राबवत असते. अशाच प्रकारे भारत सरकारच्या वतीने खते आणि औषधांकरिता 50 टक्के अनुदान देणारी महत्त्वपूर्ण अशी नवीन शासकीय योजना राबवली आहे.

 

Subsidy on fertilizer In Maharashtra अंतर्गत शेतकऱ्यांना खते आणि बियाण्यांवर 50 टक्के अनुदान मिळवण्याकरिता ऑनलाइन अर्ज करायचा आहे. शेतकरी मित्रांनो आजकाल मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे. खतांची तसेच बियाण्यांची भाव दुप्पट झालेले आहे. त्याच अनुषंगाने आपला भारत देश कृषीप्रधान बनला पाहिजे. शेतकरी बांधवांचे महागाई पासून होणारे नुकसान ठरले पाहिजे याकरिता केंद्र शासनाने खते आणि बियाण्यांवर 50 टक्के अनुदान देणारी महत्त्वपूर्ण योजना सुरू केलेली आहे.

 

शेतकरी बांधवांना औषधांमध्ये तन नाशके तसेच कीटकनाशक औषधे व जीप्स त्याचप्रमाणे रासायनिक खते व जैविक खते यांकरिता 50% पर्यंत अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना 50 टक्के पर्यंत अनुदान हे बियाणे व औषधांची खरेदी करताना देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आलेले आहे.

अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा

महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान आपल्या महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आलेले आहे. याच अभियानांतर्गत शेतकरी बांधवांना सर्व हंगामाकरिता बियाणे व औषधी यांच्या खरेदी करिता 50 टक्के अनुदान वितरित करण्यात येत आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना आता येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर होणार आहे. शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त दोन हेक्टर च्या मर्यादेपर्यंत बियाणे व औषधे यांचा लाभ मिळवता येणार आहे.

 

शेतकरी बांधव ज्या खत व औषधे विक्रेत्या यांच्याकडून खत आणि बियाण्यांची तसेच औषधांची खरेदी करतात, त्यांच्याकडून खरेदी करताना 50 टक्के अनुदान कपात करून उर्वरित पैसे त्यांना द्यायचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी ऑनलाईन अर्ज करून घ्यावा.

हे नक्की वाचा:- ठिबक सिंचन अनुदान योजना

खते व औषधे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना देण्यात येत आलेले अनुदान महाराष्ट्र शासन अतिरिक्त पणे वितरित करण्यात येणार आहेत. संबंधित लाभ मिळवू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करून घ्यायचे आहे.