तार कुंपण योजना महाराष्ट्र; 90 टक्के अनुदान नवीन अर्ज सुरू | Tar Kumpan Yojana Maharashtra

शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये तार कुंपण करण्याकरिता 90 टक्के अनुदान देणारी महत्त्वपूर्ण अशी योजना तार कुंपण योजना महाराष्ट्र सुरू झालेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये तार कुंपण करण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने 90 टक्के अर्थसहाय्य पुरविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नवीन अर्ज सुरू झालेली असून ज्या शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल त्यांनी अर्ज कसा करायचा? Tar Kumpan Yojana Maharashtra या योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे व इतर माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांची शेतजमीन ही जंगलाच्या काठाला आहे किंवा ज्या ठिकाणी मोठमोठे अभयारण्य आहेत अशा ठिकाणी आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना नेहमी रानटी जनावरांचा त्रास असतो. जंगली प्राणी या शेतकऱ्यांची पिके मोठ्या प्रमाणात उध्वस्त करत असतात. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या शेताचे नुकसान होऊ नये तसेच या शेतकऱ्यांना तार कुंपणाच्या माध्यमातून सुरक्षा प्रदान व्हावी या उद्देशाने महत्त्वपूर्ण अशी तार कुंपण योजना Tar Kumpan Yojana 2022 Maharashtra

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरिता सुरू करण्यात आलेली आहे. तार कुंपण योजना अंतर्गत करावयाची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन असून शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता सर्व बाबी ऑनलाईन पद्धतीने करायच्या आहे. कागदपत्रे सुद्धा लाभार्थ्यांना ऑनलाइनच सबमिट करायची आहे. या Tar Kumpan Yojana 2022 योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता आवश्यक कागदपत्रांची माहिती सुद्धा तुम्हाला खाली दिलेली आहे.

तार कुंपण योजना महाराष्ट्र Tar Kumpan Yojana 2022 ही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये कुंपण करून त्यांच्या शेतांचे जनावरांपासून संरक्षण करता यावे याकरिता डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येणाऱ्या शेती पिकांचे नुकसान टाळण्याकरिता महत्त्वपूर्ण अशी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या शेताला जाळीचे कुंपण करू शकता.

 

तार कुंपण योजना उद्देश

मित्रांनो शेतकऱ्यांना रानटी जनावरांपासून त्यांच्या शेती पिकांचे रक्षण करता यावे याकरिता शासनाच्या वतीने 90 टक्के अनुदान वितरीत करण्यात येणाऱ्या या योजनेचा उद्देश हा तार कंपनीच्या माध्यमातून जनावरे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आज येऊ शकणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे होणारे नुकसान टाळता येईल. असा महत्त्वपूर्ण असा उद्देश या योजनेअंतर्गत आहे.

 

तार कुंपण योजना लाभ किती मिळेल?

शेतकरी मित्रांनो तार कुंपण योजना महाराष्ट्र (Tar Kumpan Yojana Maharashtra) अंतर्गत शेताला तार कुंपण पण करण्याकरिता महाराष्ट्र सरकार 90 टक्के अनुदान देत असून उर्वरित दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांना स्वतःच्या खर्चाने जमा करून उभारावी लागेल. या योजनेअंतर्गत शासन शेतकऱ्यांना Tar Kumpan करण्याकरिता काटेरी तार तसेच त्याकरिता आवश्यक लोखंडी खांब खरेदी करण्यासाठी 90 टक्के अनुदान पुरवित आहे. Wire Fence Scheme Maharashtra

 

तार कुंपण योजना अर्ज कसा करायचा? How to apply wire fence scheme?

शेतकरी मित्रांनो तार कंपनी योजना अंतर्गत आपण ऑनलाइन सुद्धा अर्ज करू शकतो परंतु सध्या ऑनलाईन अर्ज सुरू झालेले नसल्यामुळे आपल्याला या योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल तर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीमध्ये हा अर्ज करता येतो. तुम्ही ज्या तालुक्यांमध्ये राहतात त्या तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्हाला तार कंपनी योजना चा ऑफलाइन अर्ज सादर करावा लागेल. पंचायत समितीमधील अधिकारी तुम्हाला तार कंपनी योजना संदर्भात विस्तृत माहिती सांगतील त्याचप्रमाणे अर्जासोबत तुम्हाला कागदपत्र सुद्धा सबमिट करावे लागतील.Wire Fence Scheme Maharashtra या योजना अंतर्गत करावयाचा अर्ज सुद्धा तुम्हाला पंचायत समिती मार्फत उपलब्ध करून देण्यात येईल.

महत्वाचं अपडेट: सोयाबीन पीक विमा सरकत मंजूर 

तार कुंपण योजना आवश्यक कागदपत्रे

तार कुंपण योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज करण्याकरिता तुम्हाला अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करावी लागतात. Wire Fence Scheme Maharashtra

1. ज्या जमिनीवर तार कुंपण करायचे आहे त्या जमिनीचा सातबारा व आठ अ

2. कास्ट सर्टिफिकेट

3. आधार कार्ड

इत्यादी कागदपत्रे तुम्हाला पंचायत समितीकडे सादर करून अर्ज करता येतो.

तार कुंपण योजना महाराष्ट्र संदर्भातील ही माहिती तुम्हाला आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा. तार कुंपण योजना संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास आम्हाला कमेंट करून विचारू शकतात. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची नक्कीच आम्ही उत्तर देऊ.