शेतकरी मित्रांनो ठिबक सिंचन अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवां ना त्यांच्या शेतामध्ये जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरिता महाराष्ट्र शासन ठिबक सिंचनावर 90 टक्के सबसिडी देत आहे. या ठिबक सिंचन अनुदान योजना अंतर्गत अर्ज करणे सुद्धा सुरू झालेले आहे. Thibak Sinchan Anudan Yojana Maharashtra अंतर्गत अर्ज कसा करायचा? कागदपत्रे व पात्रता याविषयी विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
ठिबक सिंचन अनुदान योजना महाराष्ट्र(Thibak Sinchan Anudan Yojana Maharashtra) अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासन 90% सबसिडी वितरित करीत आहे. शेतकरी बांधव त्यांच्या शेतामध्ये ठिबक सिंचनाची उभारणी करून त्यांच्या शेती पिकांना आवश्यकते नुसार मुबलक पाणी उपलब्ध करून, चांगले उत्पन्न मिळवू शकतात. आपल्या महाराष्ट्र राज्यात ठिबक सिंचन वर सबसिडी पुरवणाऱ्या महत्त्वपूर्ण अशा दोन योजना राबविण्यात येत आहे. त्या योजना कोणत्या आहेत, हे सुद्धा आता आपण जाणून घेऊया.
ठिबक सिंचन अनुदान योजना महाराष्ट्र लिस्ट
आपल्या महाराष्ट्र राज्यात शेतकरी बांधवांकरिता ठिबक सिंचन(Thibak Sinchan Yojana 2022 Maharashtra) पुरविणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण योजना सध्या सुरू आहेत. त्याविषयी माहिती खाली दिलेली आहे.
1. ठिबक सिंचन योजना पोखरा अंतर्गत :-
शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोखरा योजना राबविण्यात येत आहे. या पोखरा योजनेअंतर्गत ज्या गावांचा समावेश आहे, त्या गावातील शेतकरी बांधवांना ठिबक सिंचन योजने (Thibak Sinchan Anudan Yojana 2022 Maharashtra) अंतर्गत लाभ देण्यात येतो. जर तुमचे गाव पोखरा योजनेमध्ये समाविष्ट असेल तर पोखरा योजनेचे ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ठिबक सिंचन योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज करायचा आहे.
2. ठिबक सिंचन योजना महाडीबीटी अंतर्गत :-
शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना एकाच पोर्टलच्या माध्यमातून देण्याकरिता महाडीबीटी शेतकरी पोर्टलच्या शुभारंभ करण्यात आलेला आहे. या महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या योजना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. महाडीबीटी शेतकरी पोर्टल वर जाऊन शेतकरी बांधवांना ठिबक सिंचन योजना(Thibak Sinchan Yojana 2022 Maharashtra) अंतर्गत अर्ज करता येतो. महाडीबीटी अंतर्गत ठिबक सिंचन योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सुरू आहे.
ठिबक सिंचन योजना आवश्यक कागदपत्रे Documents for Thibak Sinchan Yojana Maharashtra
शेतकरी मित्रांनो ठिबक सिंचन योजना अंतर्गत लाभ घेण्याकरिता खाली कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.
1. शेतकऱ्यांचे आधार कार्ड
2. शेतकऱ्यांच्या जमिनीचा सातबारा
3. आठ अ
4. पूर्व संमती पत्र
ठिबक सिंचन योजना अर्ज प्रक्रिया Application Process for Thibak Sinchan Anudan Yojana
शेतकरी मित्रांनो ठिबक सिंचन योजना अंतर्गत तुम्हाला महाडीबीटी शेतकरी पोर्टलवरून किंवा पोखराच्या वेबसाईटवरून अर्ज करायचा असतो.
1. सर्वप्रथम महाडीबीटी शेतकरी पोर्टल किंवा महाडीबीटी पोखराची वेबसाईट ओपन करा.
2. आता या ठिकाणी तुमची शेतकरी म्हणून नोंदणी करा आवश्यक ती कागदपत्रे सबमिट करा.
3. तुमची जमिनीची माहिती प्रविष्ट करा त्याचप्रमाणे तुम्ही घेत असलेल्या पिकांची माहिती प्रविष्ट करा.
4. आता तुम्हाला अर्ज करा या ऑप्शन वर क्लिक करून ठिबक सिंचन योजनेअंतर्गत अर्जाचा ऑनलाईन फॉर्म सबमिट करायचा आहे.
5. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर तुम्ही अर्ज केल्याचा मेसेज येईल.
6. तुमचा अर्ज आता छाननी अंतर्गत मध्ये गेलेला असेल. तुमच्या अर्जाची निवड झाल्यास तुम्हाला एसएमएस प्राप्त होईल.
7. त्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती पत्र तसेच बिल व इतर कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
अशाप्रकारे आपल्याला ठिबक सिंचन अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज करता येतो. ही माहिती महत्त्वपूर्ण असेल तर इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करा.