ठिबक सिंचन योजना महाराष्ट्र 90% अनुदान नवीन ऑनलाइन अर्ज सुरू | Thibak Sinchan Yojana 2022 Maharashtra

शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सिंचनाच्या सोयी सुविधा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे या दृष्टीने राज्यात शेतकऱ्यांना ठिबक सिंचन खरेदी करण्याकरिता 90% अनुदान देणारी महत्त्वपूर्ण अशी ठिबक सिंचन योजना महाराष्ट्र राबविण्यात येत आहे. या ठिबक सिंचन योजनेअंतर्गत नवीन अर्ज सुरू झालेले असून या Thibak Sinchan Yojana 2022 Maharashtra योजने अंतर्गत अर्ज प्रक्रिया तसेच आवश्यक कागदपत्रे व या योजनेअंतर्गत कोणत्या शेतकरी लाभ मिळवू शकतात या संदर्भात विस्तृत माहिती आपण जाणून घेणार आहोत.

 

शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांनी पारंपारिक पद्धतीने शेताला पाणी न देता आधुनिक पद्धतीने सिंचनाच्या सोयी सुविधाचा वापर करून पाण्याची योग्य बचत म्हणजेच कमी पाण्यामध्ये चांगली शेती करायची याकरिता ठिबक सिंचन(Thibak Sinchan Yojana Maharashtra) हे एक महत्त्वाचे साधन आहे. आपण आपल्या शेतातील पिकाला ठिबक सिंचनाच्या साह्याने पाण्याची सोय उपलब्ध केल्यास कमी पाण्यामध्ये आपण पिकाचे उत्पन्न घेऊ शकतो तसेच सिंचनाची ही एक महत्त्वपूर्ण अशी पद्धत आहे. त्यामुळे महाराष्ट्र तसेच केंद्र सरकार वेळोवेळी शेतकरी बांधवांकरिता ठिबक सिंचन योजना राबवित असते. महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर सुद्धा अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण अशी ठिबक सिंचन अनुदान योजना ही 90 टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे.

 

या Thibak Sinchan Yojana अंतर्गत ज्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येत असते त्यांना ठिबक सिंचन करिता सुरुवातीला स्वतःच्या खर्चामध्ये ठिबक सिंचन खरेदी करून नंतर अनुदान मिळवता येते. निवड झालेली शेतकरी ऑनलाईन पद्धतीने सर्व कागदपत्रे समिट करत असतात त्यानंतर कृषी विभागाच्या वतीने योजनेअंतर्गत साहित्याची खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात येते. Thibak Sinchan Yojana 2022

महत्वाचं अपडेट : mahaDbt शेतकरी पोर्टल वर विविध योजनसाठी ऑनलाईन अर्ज सुरू असा करा अर्ज 

महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांना ठिबक सिंचन(thibak sinchan) पुरविण्यात येत आहे. अल्पभूधारक तसेच अत्यल्पभूधारक व इतर शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गातील कोणत्याही शेतकऱ्याला लाभ मिळवता येणार आहे.

 

मित्रांनो आपण पारंपारिक पद्धतीने आपल्या शेती पिकांना पाणी देत असतो. त्यामुळे आपला भरपूर मोठा वेळ वाया जातो तसेच या पद्धतीमध्ये खूप कष्ट करावे लागते त्यानंतर पूर्ण शेताला पाणीपुरते परंतु योग्य प्रमाणात पिकांना पाणी मिळू शकत नाही आपण या पद्धतीमध्ये दांडाच्या द्वारे पाणी देत असल्यामुळे पाण्याची नासाडी सुद्धा होते ज्या ठिकाणी पाण्याची आवश्यकता नाही त्या ठिकाणी पाणी पोहोचते. त्यामुळे आपल्या विहिरीतील पाण्याचे प्रमाण कमी होते परिणामी आपण विविध हंगामामधील पिके घेऊ शकत नाही. त्यामुळे जर आपण ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला तर पिकाला योग्य प्रमाणात पाणी मिळेल. परंतु प्रत्यक्षात शेतकरी स्वतःच्या खर्चाने एवढे महाग असलेले ठिबक सिंचन खरेदी करू शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना फक्त दहा टक्के खर्च करून 90 टक्के अनुदान वितरित करीत आहे. Thibak Sinchan Yojana 2022

 

ठिबक सिंचन योजना अर्ज कुठे करायचा? Thibak Sinchan Yojana Maharashtra Application Process

शेतकरी मित्रांनो ठिबक सिंचन योजना (Thibak Sinchan Yojana 2022-23) महाराष्ट्र अंतर्गत लाभ मिळण्याकरिता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. महाराष्ट्र शासनाच्या योजना अनेक अर्ज एक या महाडीबीटी शेतकरी फोटोवर जाऊन सर्वप्रथम नोंदणी करायची आहे. या पोर्टलवर शेतकरी म्हणून नोंदणी केल्यास तुम्ही लॉगिन करा व त्यानंतर विविध योजना तुमच्या समोर दिसतील त्यापैकी ठिबक सिंचन योजना याकरिता अर्ज करा. ठिबक सिंचन योजना करिता अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणी कृत मोबाईल नंबर वर अर्ज केल्याचा एसएमएस प्राप्त होईल.

 

ठिबक सिंचन योजना लाभार्थी निवड प्रक्रिया

मित्रांनो ठिबक सिंचन योजना महाराष्ट्र 2022 (Thibak Sinchan Yojana Maharashtra)अंतर्गत लक्षांक पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास प्राप्त झालेल्या अर्जावर छाननी करून त्यांची ऑनलाइन सोडत करण्यात येते. ज्या शेतकऱ्यांच्या अर्जाची ऑनलाईन लॉटरीमध्ये निवड झालेली आहे त्यांना एसएमएस प्राप्त होतो व या योजनेअंतर्गत लाभ मिळवून देण्यात येतो.

निवड झालेल्या लाभार्थ्यांनी शेतकरी पोर्टलवर लॉगिन करून आपली सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा करण्यात येते.

ठिबक सिंचन योजना (thibak sinchan scheme maharashtra) संदर्भातील ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल अशी आशा व्यक्त करतो. ही माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की शेअर करा. ठिबक सिंचन योजनेसंदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास कमेंट करून प्रश्न विचारा. तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची नक्कीच उत्तरे आम्ही देऊ.