ट्रॅक्टर योजना अंतर्गत महाराष्ट्र शासन वितरित करीत आहे 4.50 लाख रुपये अनुदान ऑनलाइन अर्ज सुरू tractor subsidy scheme maharashtra

शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी हा आधुनिक शेतीकडे वळला पाहिजे. या दृष्टीने केंद्र तसेच राज्य सरकार वेळोवेळी शेतकरी हिताच्या योजना राबवित असते. त्याच योजनांपैकी महत्त्वपूर्ण अशी ट्रॅक्टर वर साडेचार लाख रुपये अनुदान देणारी योजना ही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे. ट्रॅक्टर योजना अंतर्गत मिळणारे साडेचार लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये तात्काळ जमा करण्यात येणार आहे. या संबंधित अर्ज कुठे करायचा कागदपत्रे यांच्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

 

tractor subsidy योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्याकरिता 90% अनुदान म्हणजेच साडेचार लाख रुपये पर्यंत अनुदान वितरित करण्यात येत आहे. शेतातील विविध कामे पूर्ण करण्याकरिता शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टरची खूप आवश्यकता असते. स्वतःच्या शेतातील कामे करून त्याचबरोबर इतरांच्या शेतामध्ये ट्रॅक्टर भाड्याने लावून याद्वारे उत्पन्न देखील मिळवता येते. याच अनुषंगाने शेतकरी बांधवांना स्वतःची हक्काचे ट्रॅक्टर उपलब्ध व्हावे याकरिता शासनातर्फे 4 लाख 50 हजार रुपये अनुदान वितरित करीत आहे.

 

या ट्रॅक्टर योजना अंतर्गत संबंधित शेतकऱ्यांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने शासनाच्या वेबसाईटवर सादर करायचा आहे. संबंधित शेतकऱ्यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएस प्राप्त होईल. त्यानंतर संबंधित शेतकरी बांधवांना आजारांची खरेदी केल्यानंतर अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.

आत्ताच ट्रॅक्टर योजना अंतर्गत अर्ज करा

ट्रॅक्टर योजन अंतर्गत 4 लाख 50 हजार रुपये अनुदान मिळवण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील अर्जदारांना तसेच स्वयंसहाय्यता बचत गट ज्या गटामध्ये कमीत कमी 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असले पाहिजे. त्याचप्रमाणे अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे.

 

ट्रॅक्टर अनुदान योजना संदर्भातील ही माहिती आवडल्यास इतराना देखील शेअर करा.अश्याच माहिती करिता या वेबसाइट वर भेट देत रहा.