YouTube Monetization काय आहे? यूट्यूब वरून पैसे कमविणे | YouTube Monetization Information in Marathi

मित्रांनो आजकाल आपण सर्वजण यूट्यूबचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहोत. आपल्याला कोणतीही अडचण आली, कशाचीही माहिती हवी असेल तर आपण आपल्या मोबाईल मध्ये लगेच युट्युब ओपन करतो, आणि युट्युब व्हिडिओ पाहतो. युट्युब व्हिडिओ पाहत असताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला जाहिरात दिसते. तसेच व्हिडिओ पाहत असताना सुद्धा वेगवेगळ्या जाहिराती दिसतात. यातूनच त्या युट्युबरला पैसे मिळत असतात. आणि त्याकरिता म्हणजेच युट्युब वर जाहिराती दाखवून पैसे कमवण्याकरिता यूट्यूब चैनल Monetize करावे लागते. त्यानंतर त्या युट्युबर ला पैसे मिळणे सुरू होते. आजच्या या पोस्टमध्ये आपण YouTube Monetization काय आहे? या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. YouTube Monetization Information in Marathi

आजकाल अनेक लोकं यूट्यूब वरून खूप कमाई करत आहेत. हे एक कमाईचे साधन आहे. YouTube वरून कमाई करण्यासाठी ते Monetize करावे लागते. आता आपण YouTube Monetization विषयी माहिती जाणून घेऊया. What is YouTube Monetization

 

YouTube Monetization काय आहे? YouTube Monetization Information In Marathi

युट्युब मॉनिटायझेशन (YouTube Monetization)म्हणजे आपण आपल्या यूट्यूब चैनल वर जाहिराती प्रकाशित करण्याकरिता अप्लाय करणे. युट्युब मॉनिटायझेशन साठी अप्लाय करून आपले यूट्यूब चैनल मॉनिटाइज झाल्यानंतर आपण आपल्या यूट्यूब चैनल वर जाहिराती दाखवून पैसे कमवू शकतो. या सर्व प्रोसेसला यूट्यूब मॉनिटायझेशन प्रक्रिया म्हणतात. युट्युब मॉनिटायझेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचा युट्युब शी करार झालेला असतो. YouTube Monetization Information in Marathi

 

युट्युब वरून पैसे कसे कमवायचे? How to make money from YouTube?

युट्युब मॉनिटायझेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपल्या यूट्यूब चैनल वर जाहिराती दाखविण्यासाठी ॲक्सेस मिळते. आता आपल्या यूट्यूब चैनल च्या व्हिडिओमध्ये जाहिराती येथे सुरू झाल्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओवर जेवढे जास्त व्ह्यूज येतील तेवढी जास्त जाहिरात त्या लोकांना दाखवण्यात येईल. How to Earn Money on YouTube in Marathi आणि त्याचे पैसे आपल्याला मिळेल. आपण युट्युब वरून कमविलेले पैसे Google AdSense पाठवण्यात येते. आपण एका महिन्याला जेवढी कमाई केली त्या कमाईच्या 45% रक्कम युट्युब स्वतःकडे ठेवते व बाकीचे पैसे आपल्याला देते. How to Earn Money on YouTube

 

यूट्यूब चैनल मॉनिटाइज कसे करायचे? How to Monetize YouTube Channel?

आपल्याला आपले यूट्यूब चैनल मॉनिटाइज करण्याकरिता आपला यूट्यूब चैनल वर एकूण 1000 सबस्क्रायबर असायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या यूट्यूब चैनल वर 4000 तास Watch Time हा कम्प्लीट असायला पाहिजे. जर या दोन गोष्टीची पूर्तता आपण करत असाल तर आपल्याला यूट्यूब चैनल मध्ये युट्युब मॉनिटायझेशन करिता अप्लाय करा. असा पर्याय दिसतो त्या पर्यावर क्लिक करून आपण युट्युब मॉनिटायझेशन करू शकतो.how to earn money on YouTube in Marathi

हे नक्की वाचा:- CIBIL Score म्हणजे काय? CIBIL score कसा वाढवायचा?

यूट्यूब चैनल मॉनिटाइज करण्याकरिता अटी शर्ती व पात्रता

यूट्यूब चैनल मॉनिटाइज करण्याकरिता आपण खालील अटी व शर्ती तसेच निकषाची पूर्तता केली पाहिजे.

यूट्यूब चैनल वर जाहिराती दाखवण्यासाठी म्हणजेच ते मॉनिटाइज करण्यासाठी आपल्या यूट्यूब चैनल वर एक हजार सबस्क्रायबर आणि 4000 तासांचा Watch Time कम्प्लीट असायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या यूट्यूब चैनल वर स्वतःचे व्हिडिओ असावेत. इतरांची व्हिडिओ तसेच कॉपी-पेस्ट केलेले व्हिडिओ टाकून आपण यूट्यूब चॅनल ला मॉनिटाइज करू शकत नाही. इतरांची व्हिडिओ डाऊनलोड करून परत तेच युट्युब वर टाकल्यास त्याचे आपल्याला पैसे मिळणार नाही. आपल्याला युट्युब वर एडवर्टाइजमेंट फ्रेंडली व्हिडिओज बनवावे लागतील. तसेच हत्यार, मारहाण, खून तसेच अश्लील या प्रकारची व्हिडिओज आपण युट्युब वर अपलोड करू शकत नाही. असे केल्यास आपले यूट्यूब चैनल चे मोनिटायझेशन बंद होऊ शकते. YouTube Monetization information in Marathi, how to earn money on YouTube in Marathi

हे नक्की वाचा:- आपल्या नावावर किती सिम कार्ड रजिस्टर आहेत? असे माहीत करा.

वरील अटी व शर्ती योग्यरीत्या पाळल्यास आपण यूट्यूब चैनल वरून खूप सारे पैसे कमवू शकतो. ही माहिती महत्वपूर्ण असल्यास इतरांना नक्की शेअर करा.